scorecardresearch

Video: भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी ५ मुलींनी एकीला बेदम मारले; भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला देखील पडल्या लाथा-बुक्या

पाच मुलींची एकीला बेदम मारहाण…viral video पाहून तुम्हीही हैराण व्हाल

Video: भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी ५ मुलींनी एकीला बेदम मारले; भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला देखील पडल्या लाथा-बुक्या
photo: social media

बिहार मधल्या सारण जिल्ह्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात काही मुली एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार बॉयफ्रेंड वरून झाल्याचे समजण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पाच मुली मिळून एका मुलीला अशाप्रकारे मारताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

बॉयफ्रेडवरून झाले भांडण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे या मुली तरुणीला मारत आहेत. यातील काहीजणी लाथेने मारत आहेत तर कोणी केस ओढत आहेत. यातच आजूबाजूला जमलेल्या लोकांपैकी एक तरुण त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण या मुली त्या मुलाला देखील मारत आहेत. सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

( हे ही वाचा: Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच)

मिळालेल्या माहितीनुसार या मुली तरुणीला यासाठी मारत होत्या कारण तरुणी दुसऱ्याच्या बॉयफ्रेंडला स्वतःचा बॉयफ़्रेंड म्हणत होती. विशेष म्हणजे ती त्याच्यासोबतच जत्रेत देखील फिरत होती. या कारणावरून या मुलींनी या तरुणीला भर जत्रेत सर्वांसमोर बेदम चोपलं. या मुली कुठल्या याची अद्याप माहिती मिळाली नाही आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 15:55 IST

संबंधित बातम्या