Bihar thieves steal oil from moving goods train in bihta patna after train bridge tower watch viral video gps 97 | Loksatta

चोरांचा जीवाशी खेळ! बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

जीवाशी खेळत चोरांची चालत्या ट्रेनमधून तेल चोरी, पहा बिहारमधील चोरट्यांची ही धक्कादायक करामत

चोरांचा जीवाशी खेळ! बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का
photo(social media)

Bihar Thieves Steal Oil From Moving Train: बिहारमध्ये होणाऱ्या चोरीच्या बातम्या तुम्ही बऱ्याचवेळा ऐकल्या असतील. काही काळापूर्वी मोबाईल टॉवर आणि पुल चोरीची प्रकरणेही तुम्हाला माहिती असेल. सध्या बिहारमधून आणखी एक चोरीचे प्रकरण समोर आले आहे जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. चोर अशा पद्धतीने चोरी करू शकतात याची तुम्ही याआधी कल्पनाही केली नसेल. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बिहारमधील चोर चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत.

मालगाडीतून तेल चोरीचे प्रकरण आले समोर

नुकत्याच एका व्हिडिओमध्ये, बिहारमधील चोरांनी पाटणाच्या प्रशासकीय उपविभाग बिहटा येथून जाणाऱ्या तेल टँकर ट्रेनला लक्ष्य केले. @KhatoonShamsida या ट्विटर युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याने व्हिडिओसोबत लिहिले की, “बिहारमध्ये चालत्या मालगाडीतून तेल चोरी करण्यास सुरुवात, हा व्हिडिओ बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बिहता नगरचा असून, चालत्या मालगाडीतून चोरी करतानाचे हे दृश्य आहे”. तेल चोरी करताना कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर सोशल मीडियावर टाकल्याचे दिसते. स्थानिकांनी तेलाचे टँकर घेऊन जाणाऱ्या मालगाडीवर हल्ला केला आणि नंतर त्यांच्या बादल्यांमध्ये तेल भरण्यासाठी धावताना दिसले.

( हे ही वाचा: नवरदेवाची भन्नाट एन्ट्री! चक्क कुत्र्यासोबत आला बाईकवर बसून, Video व्हायरल)

चोरांनी जीव धोक्यात घालून तेल चोरले

( हे ही वाचा: Video: दिल्लीतील भररस्त्यात ‘पानी दा रंग’ गाणे गात होता तरुण; अचानक आयुष्मान खुराना त्याच्या समोर आला अन्…)

व्हिडीओ लक्ष देऊन पाहिल्यास दिसून येईल की, बादलीत तेल भरत असताना एक रेल्वे ब्रिजही आहे, जिथे चोरटे जीवाची पर्वा न करता धावत आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या तेल डेपोकडे जाणारी मालगाडी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच चोरांनी तेल चोरण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत या कृत्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या कंमेंट करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:04 IST
Next Story
डॉक्टराची इंजेक्शन देण्याची पद्धत पाहिली का? लहान मुलंही होत आहेत आनंदाने सहभागी, पाहा Viral Video