scorecardresearch

शिक्षिकेने अतिशय मजेदार पद्धतीने गिरवले ज्ञानाचे धडे, विद्यार्थीही झाले खुश, पाहा व्हिडिओ..

बिहार येथील एका शिक्षिका देखील मजेदार पद्धीतने आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना दिसून आली. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे नेटकरी तिचे कौतुक करत असून, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शिक्षिकेने अतिशय मजेदार पद्धतीने गिरवले ज्ञानाचे धडे, विद्यार्थीही झाले खुश, पाहा व्हिडिओ..

विद्यार्थ्याच्या आयुष्यात आई वडिलांप्रमाणेच शिक्षकांचे मोठे स्थान असते. शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन आपल्या पायावर उभे होण्यासाठी मदत करतात. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्या प्रति अपार आदर असतो. अलीकडे काही शिक्षक पारंपरिक पद्धतीने शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी काही मजेदार पद्धती अवलंबत आहेत. बिहार येथील एका शिक्षिका देखील मजेदार पद्धीतने आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना दिसून आली. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे नेटकरी तिचे कौतुक करत असून, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ आयएएस अधिकारी दीपक कुमार सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शिकवत असल्याचे दिसून येते. ती संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे, त्यांच्यासोबत खेळत आहे. अलीकडे विद्यार्थी अभ्यासाच्या तणावाखाली दिसून येतात. मात्र, व्हिडिओमधील विद्यार्थ्यांना ही शिकवण्याची पद्धत जाम आवडल्याचे दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललेले दिसते.

(झोमॅटोने मजेदार मिम शेअर करून सांगितली ट्विटरची परिस्थिती, नेटकऱ्यांनीही दिला प्रतिसाद)

खुशी कुमारी असे शिक्षिकेचे नाव आहे. आयएएस दीपक कुमार सिंह यांनी या शिक्षिकेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. दीपक कुमार सिंह यांनी कॅप्शनमध्ये शिकवण्याच्या पद्धतीवर भाष्य केले. तुम्ही काय शिकवता यापेक्षा तुम्ही कसे शिकवता आणि ते मुलांना किती समजते, हे महत्वाचे आहे, असे दीपक कुमार सिंग म्हणाले. उदहारण म्हणून त्यांनी बिहारच्या बांका येथील शिक्षिकेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

या व्हिडिओला २१ हजार व्ह्युज मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खुशीने जी मजेदार पद्धत वापरली त्यापासून नेटकरी प्रभावित झाले आहेत. युजर्सनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने व्हिडिओ पाहून ‘ये है बदलता हुआ बिहार’, असे लिहून शिक्षिकेचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या