Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची आहे.

एकामागोमाग अपघातांचा थरार

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Bird video goes viral
VIDEO: ‘आयुष्यभर कितीही पैसा कमवा शेवटी’ पक्ष्याचा हा व्हिडीओ पाहून कळेल पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे
Animal Fight Video Deer Vs Lion Video Viral On Social Media Trending
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! हरीण तावडीतून असं सुटलं की थेट सिंहच तोंडावर आपटला; पाहा VIDEO
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
Driver sleeping in moving bus dangerous Accident
VIDEO: एक डुलकी मृत्यूची! गाडी चालवताना डोळा लागला आणि घात झाला; अवघ्या २ सेंकदात भीषण अपघात

या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे, ज्यामध्ये वाहनचालकांना वेग आणि समोरील वाहनचालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सरळ ब्रीज आहे. या ब्रिजवरून अनेक गाड्या वेगात धावत आहेत. यावेळी एकमार्गी रस्त्यात अचानक एक सायकलस्वार उलट्या दिशेने येतो आणि वेगात असणाऱ्या बाईकचं अचानक समोर सायकल आल्यानं नियंत्रण बिघडतं. मात्र, तरीही हा बाईकचालक कसाबसा स्वत:ला सावरतो. दरम्यान, भरधाव वेगात मागून येणारा बाईकचालक मात्र या सायकलस्वारामुळे पडतो आणि फरफटत जातो. यानंतर तर हा सायकलस्वार हद्दच करतो, आपल्यामुळे अपघात झाला हे माहिती असूनही तो तिथून त्याला उचलायचं सोडून पळ काढतो.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. चुकीच्या दिशेने येऊन इतरांची सुरक्षा धोक्यात घालून ही व्यक्ती तिथून पसारही झाली. नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.