Bike caught fire viral video: वाईट प्रसंग कधी सांगून येत नाही. आजकाल जागोजागी आपल्याला अशा धक्कादायक घटना पाहायला मिळतात, त्या पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. मग ‘अशी वाईट वेळ कधीच कोणावर येऊ नये’ हे वाक्य आपसूक आपल्या तोंडावर येतं. या धकाधकीच्या जीवनात कधी काय होऊन बसेल ते सांगता येत नाही.

सध्या अशीच भयंकर दुर्घटना एका ठिकाणी घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत एका बाईकला मोठी आग लागल्याने अनेक जण त्या आगीत होरपळून निघतात. या धक्कादायक दुर्घटनेत नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा… आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका चिकन शॉपसमोर एका बाईकला आग लागलेली दिसतेय. ही आग विझविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसतायत. एक माणूस त्यावर कापड टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे; तर एक जण पाण्याचा फवारा आगीवर मारताना दिसतोय. इतक्यात अजून एक माणूस त्या बाईकजवळ जातो आणि आग विझवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करीत असतो. तितक्यात आग जोरात भडकते. या आगीच्या भडक्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांनादेखील आग लागते. तसंच यादरम्यान त्या बाईकजवळ असलेले काही जण या आगीत होरपळून जातात. आगीचा भडका उडाल्यामुळे सगळेच लांब पळतात; पण बाईकजवळ असणारे काही जण या आगीत होरपळत असतात. ते पाहून काही लोक नंतर त्यांच्या मदतीला धावून येतात. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकलेले नाही.

हा व्हिडीओ @krchoudhary0789 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ‘बाइक में आग लग जाए तो उससे दूर रहे नतीजा आपके सामने है’, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हायरल व्हिडीओला तब्बल १.१ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… एका बापाची मजबुरी! कोणत्याच मुलावर ‘हे’ बघायची वेळ येऊ नये; VIDEO पाहून व्हाल निशब्द

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “आग लागली आहे आणि तीच टाकी उघडायला गेला तो माणूस. कसे अडाणी लोक आहेत, यांना पेट्रोलची टाकी फुटेल हेदेखील कळत नाही.” तर दुसऱ्याने, “बिचारे लोक, सगळे फक्त मदत करण्याच्या भावनेने पुढे गेले होते.” या माणसांच्या गर्दीत एक पोलीसदेखील तिथे उभा असल्याने एकाने कमेंट करीत लिहिलं, “पोलिसवाल्यांना आपात्कालीन स्थितीत आग विझवण्याची ट्रेनिंग दिली जाते आणि हा पोलिस बघा मागे फक्त उभा आहे”

Story img Loader