इतक्या भयंकर अपघातातून वाचणं शक्यच नव्हतं, पण…! चमत्कारिक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

बसखाली आलेला बाईकस्वार काही क्षणात उठला आणि आपल्या अंगावरची धूळ झटकत आपली बाईक घेत तिथून निघून गेला.

motorcyclist-trapped-under-bus-viral-video

काळ आला होता पण वेळ आली नव्हती….या म्हणीचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा एक बाईकस्वार अपघातात चक्क बसखाली आला होता. पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून प्रत्येकजण हैराण झाला. बसखाली आलेला बाईकस्वार काही क्षणात उठला आणि आपल्या अंगावरची धूळ झटकत आपली बाईक घेत तिथून निघून गेला. हा चमत्कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातल्या हायवेवर एका वळणावर बाईकस्वार बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. पण यात बाईकस्वाराचा अंदाज चुकला आणि थेट वेगात येणाऱ्या बसला धडकला. या अपघातात बाईक आणखी १० फूट पुढे घसरत गेली आणि बाईकस्वार बसखाली आला. बसखाली आल्यानंतर हा बाईकस्वार चिरडला गेला असणार असं वाटत असतानाच पुढे जे काही घडलं ते पाहून प्रत्येक जण हैराण झालाय.

दैव बलवत्तर म्हणून…
दैव बलवत्तर होतं म्हणून बस चालकाने वेळेवर वेगाने धावणाऱ्या बसला ब्रेक लावला. अन्यथा चाकांखाली येणाऱ्या तरुणाचं आयुष्य जवळजवळ संपलंच असतं. बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या बाईकस्वाराच्या जीवावर बेतला असता. या अपघातात तो बसच्या चाकाखाली आला नाही म्हणून तो यातून वाचला. काही क्षणातच बाईकस्वार बसखालून हळूहळू बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला उभं राहताना पाहून प्रत्येक जण सुटकेचा श्वास घेतोय. इथक्या भयंकर घटनेतून वाचलेलं पाहून बाईकस्वार स्वतः हैराण झाला. त्यानंतर रस्त्यावरील इतर प्रवासी त्याला मदत करण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : एका ग्लासमुळे नवऱ्याची झाली ‘अशी’ फजिती, पाहा व्हिडीओ!

आणखी वाचा : बंदुकीसोबत व्हिडीओ बनवल्याने खाकी वर्दी गेली; पण सोशल मीडियावर बनली स्टार

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, काळ आला पण वेळ आली नव्हती….काही सेकंदात या बाईकस्वाराचा जीवही गेला असता पण त्यानंतर घडलेला चमत्कार पाहून सोशल मीडियावरील युजर्स हैराण झाले आहेत. हा चमत्कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी बाईकस्वाराच्या चुकीबाबत संताप व्यक्त केला आहे. एका यूजरनं म्हटलं, की अशा लोकांमुळे अनेक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. तर, आणखी एकानं म्हटलं की अशा लोकांविरोधात कडक कारवाई करायला हवी. अनेकांनी असंही म्हटलं, की बस आणि बाईक चालक या दोघांच्याही सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bike rider came under the bus while overtaking shocking pictures seen in cctv dahod gujarat prp

ताज्या बातम्या