Premium

“हेल्मेट का नाही घातलं?” पोलिसांनी विचारताच तरुण गाऊ लागला गाणं, Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल

पोलिसांकडून सतत हेल्मेटशिवाय दुचाकी न चालवण्याचे आवाहन केले जाते.

road, traffic rules
आपल्या देशात वाहतुकीचे नियम मोडणे ही एक सामान्य बाब झाली आहे. (Photo : Instagram)

आपल्या देशात वाहतुकीचे नियम मोडणे ही एक सामान्य बाब झाली आहे. अनेक लोक दररोज वाहतुकीचे नियम मोडत असतात. काहीजण दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट वापरत नाहीत, तर काहीजण कारमधून प्रवास करताना सीट बेल्ट बांधत नाहीत. त्यामुळे अनेकदा अशा लोकांना वाहतूक पोलिस दंड भरायला लावतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी पोलिस वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवतात असतात, पण त्याचा लोकांवर फारसा परिणाम होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाय अनेकदा पोलिसांकडून हेल्मेटशिवाय दुचाकी न चालवण्याचे आवाहन करण्यात येते. तरीही लोक वाहतूक नियमांबाबत जागरुक नसल्याचं दिसून येत. सध्या अशाच एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने हेल्मेट घातलं नाही म्हणून पोलिस त्याला अडवतात. पण पोलिसांनी अडवल्यानंतर त्या तरुणाने असं काही कृत्य केलं आहे. जे पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणं कठीण होईल यात शंका नाही.

हेही पाहा- चक्क हवेत तरंगतोय दगड? व्हायरल फोटोमागील वास्तव समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क

पोलिसांसमोर म्हणू लागला गाणं –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांना पाहताच तरुण बाईक थांबवतो. पोलिसांसह काही लोकांनी त्या तरुणाला घेरल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे इच्छा असूनही तेथून पळ काढणं अशक्य असल्याचं तरुणाच्या लक्षात येताच तो पोलिसांच्या कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी चक्क गाणं गायला सुरुवात करतो. शिवाय गाण्यातूनच तो आपली चूक झाल्याचंही कबुल करतो. शिवाय तो पोलिसांना आकर्षित करण्यासाठी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांशी संबंधित गाणं म्हणत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, असं तो गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही पाहा- एकाचवेळी २ सायकल पळवणाऱ्या व्यक्तीचा Video व्हायरल, अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

काहीही झाले तरी दंड होणारच –

हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, जर कोणत्याही मंत्राचा परिणाम होणार नाही तर चलान कापले जाईल. तर आणखी एका यूजरने लिहिले की, भावा आता काहीही कर, पण तुझे चलान निश्चित झाले आहे. त्यामुळे या तरुणाने कितीही गाणी म्हटलं तरी काही उपयोग होणार नसल्याचं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पाहून अनेकांचे मनोरंजन होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 16:05 IST
Next Story
पोलिसांच्या भीतीने ड्रायव्हरने अचानक वळवली भरधाव कार, थेट ट्रकवर कोसळली अन्…, भयंकर घटनेचा Video व्हायरल