अनेकदा कार, ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. अनेक लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे एखादा ट्रक किंवा कार नाही तर एक बाइक चर्चेचा विषय बनली आहे.

देशात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एका बाइकचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याच्या मागे एक संदेश लिहिलेला आहे. या बाइकवर नंबर प्लेटच्या खाली “बायकोने सांगितलंय गाडी कोणाला देऊ नका” असं लिहिलं आहे. आता ही बाइक सोशल मीडियावर लोकांमध्ये हसण्याचा विषय बनली आहे. मात्र, हा मेसेज पाहून गाडीचा मालक बायकोशी प्रामाणिक आहे हे नक्की आणि उघडपणे सांगतोय.

व्हायरल झालेल्या या बाइकचा फोटो @dj_sunyaedits या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या फोटोला “आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं” अशी कॅप्शन दिली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या बाइकचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “रिक्षाने जा पण गाडी मागू नका भावांनो” तर दुसऱ्याने “मला सोडून दुसऱ्याला गाडी देऊ नका असं सांगितलं आहे” अशी कमेंट केली.

दरम्यान, अशा कोट्ससह बाइक ऑनलाइन व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अशा फनी कोट्समुळे अनेक वाहने लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहेत.

Story img Loader