Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ आपल्याला विचार करायला भाग पडतात. काही व्हिडीओंमधून भरपूर शिकायलाही मिळतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओतून तुम्हालाही जगण्याचं गमक कळेल. गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. एका पक्ष्याचा हा व्हिडीओ असून जास्त हाव केल्यानं काय होतं हे पाहायला मिळालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्यभर कितीही पैसा कमवा, शेवटी जेवढा नशिबात आहे तेवढेच तुम्हाला मिळणार.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पक्षी फांदीवर बसला आहे. आता पावसाळ्यात पक्ष्यां खाद्य म्हणजे मासेच. अशाच काही माशांची शिकार करुन या पक्षानं आणली आहे. यावेळी पक्ष्याच्या चोचीत ४ ते ५ मासे दिसत आहेत. मात्र त्याला एकही मासा खायला येत नाहीये, तो सगळे मासे खाण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे तुम्ही पाहू शकता की, एक एक करत सगळे मासे त्याच्या चोचीतून पडून जातात आणि शेवटी एकच मासा त्याला खायला मिळतो. याचा अर्थ जास्त हाव केल्यानं काहीच आपल्या जवळ उरत नाही.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Puneri Pati Puneri Poster Goes Viral On Social Media
Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच
Brave Woman Fights Off Around 15 Stray Dogs With Slipper In Hyderabad shocking video
VIDEO : भयंकर! जमिनीवर पाडले, लचके तोडले; ती किंचाळत राहिली अन्…मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला
Maharashtra: Man Rams Speeding Car Into Chiplun Hotel Over Delay In Getting Water Bottle; Video Viral
VIDEO: एका क्षणाचा राग सगळं उद्ध्वस्त करतो! चिपळूणमध्ये पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने पाहा तरुणाने काय केले…
Believe in Karma hive bird and Crow fighting Video Goes Viral
‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ घारीने कावळ्याला अवघ्या ४० सेकंदात दाखवलं आस्मान; VIDEO एकदा पाहाच
Bailgada sharyat shocking video goes viral on social media Bailgada sharayat permission
VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच
Jump into the water and catch the crocodile in its jaws dangerous video
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ बिबट्याची चलाख चाल अन् मगरीचा शेवट; खतरनाक युद्धात शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

पैसा वास्तव आहे, पण यश नव्हे…

पैसा हे व्यवहाराचे साधन आहे. काही लोकांचे पैशांवर प्रेम असते. काही लोक त्यासाठी मरतात, काही लोक त्याचा सुयोग्य वापर करतात. काही उधळतात, बरेच लोक त्यासाठी लढतात, पण बहुसंख्य लोक तो मिळविण्याची ईर्ष्या बाळगून असतात. पैसा म्हणजे संपत्ती, पैसा म्हणजे पॉवर. लोकांना वाटते त्यापेक्षा खूप कमी पैसा माझ्याकडे आहे. संपत्ती हे देखील आयुष्याचे उद्दिष्ट असू शकते. पण, पैसा कमावल्यानंतर असे लक्षात आले आहे की, पैसा हे कटू वास्तव आहे, पण तो कमावणे म्हणजेच यशाचा कळस गाठणे नव्हे. पैशामुळे कोट्यवधी चांगल्या गोष्टी तुम्हाला सहज मिळतील. पण मृत्यूनंतर तुम्हाला काहीच सोबत नेता येत नाही. त्यामुळे निरोगी आयुष्य हाच एक महत्त्वाचा घटक आहे. तो दुर्लक्षित करण्यासारखा नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ठुकरा के मेरा प्यार…आयएएस अधिकारी होताच प्रेयसी सोडून गेली; प्रेमभंग झाल्यानं प्रियकरानं काय केलं पाहाच

हा व्हिडीओ inshot_india नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, यावर नेटकरी वेगेवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.