Premium

मित्राचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात! रस्त्याच्या मधोमध कापत होते केक; पोलिसांनी सर्वांनाच दिले असे ‘रिटर्न गिफ्ट’

भररस्त्यात मित्राचा वाढदिवस साजरा करणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

birthday boy got into trouble after cutting cake on the middle of the road police arrested
मित्राचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात! रस्त्याच्या मधोमध उभे राहून कापत होते केक; पोलिसांनी सर्वांनाच दिले असे 'रिटर्न गिफ्ट' ( photo – @UNEWSUP twitter)

हल्ली मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी काही जण भलत्याच गोष्टी करतात. त्यात रस्त्यात वाहन उभे करीत फटाक्यांची आतषबाजी करून वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. त्यामुळे अनेकदा त्याचा इतरांना त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशतील नोएडामध्ये काही तरुण चक्क रस्त्याच्या मधोमध केक ठेवून अगदी दणक्यात मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करीत होते; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सोमवारी चार जणांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोएडातील सेक्टर १ मधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, रस्त्याच्या मधोमध एक मोठी फळी ठेवून, त्यावर अनेक केक ठेवलेले आणि त्याभोवती अनेक तरुण जमले होते. यावेळी त्यांच्या बाजूने अनेक वाहने ये-जा करीत होती. मात्र, त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या फळीमुळे एक प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. व्हिडीओनुसार हे सर्व तरुण मद्यधुंद अवस्थेत होते आणि यावेळी त्यांनी रस्त्यातच फटाकेही फोडले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Birthday boy got into trouble after cutting cake on the middle of the road police arrested sjr

First published on: 04-10-2023 at 12:05 IST
Next Story
तरुणाईमध्ये काकांची हवा! भन्नाट डान्स पाहून तुम्हीही चाहते व्हाल , VIDEO एकदा पाहाच