birthday boy slap friend on birthday | Loksatta

Viral : वाढदिवसात मुलाने हकनाक खाल्ला मार, बर्थडे बॉयने थेट कानशिलातच लगावली, काय झाले पाहा..

वाढदिवसात एक मुलाने हकनाक मार खालल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बर्थडे बॉयची कुणी तरी गंमत केली, मात्र त्याने याचा संताप भलत्याच मुलावर काढला.

Viral : वाढदिवसात मुलाने हकनाक खाल्ला मार, बर्थडे बॉयने थेट कानशिलातच लगावली, काय झाले पाहा..
फोटो

वाढदिवसात एका मुलाने हकनाक मार खालल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बर्थडे बॉयला कुणी तरी छेडले, मात्र त्याने याचा संताप भलत्याच मुलावर काढला. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. meemlogy नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ नेटकऱ्यांना पोट धरून हसवत आहे.

व्हिडिओमध्ये एका मुलाचा वाढदिवस साजरा होत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या आनंदात अनेक मुले सहभागी झाली आहेत. मुला समोर भलामोठा केक आहे. बर्थडे बॉय केक जवळ आपले नाक घेऊन जातो तितक्यात मागून कोणी तरी हाताने त्याचे डोकं पकडतो आणि त्याचे तोंड केकमध्ये घालतो. या प्रकाराने संतापलेला मुलगा त्याच्या बाजूला उभे राहून हसत असलेल्या मुलाच्या कानशिलात जोरदार लगावतो. त्याच्या या कृत्याने सर्व मुले काही काळासाठी स्तब्ध होतात.

मारहाण झालेल्या मुलाची यात काही चुकी नाही. हे काम दुसऱ्याने केल्याचे दिसून येते. पण यात बेचाऱ्या मुलाला हकनाक मार पडतो. त्याला वेदना होत असल्याचे देखील व्हिडिओत दिसून येते. केले भलत्यानेच आणि मार भलत्यालाच पडला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू अणावर होत आहे.

नेटकऱ्यांनी दिली मजेदार प्रतिक्रिया

व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाढदिवस असल्याने बर्थडे बॉयला मार देता येणार नाही, तसे केल्यास केकपण मिळणार नाही, अशी गंमत एका युजरने केली आहे. तर एकाने व्हिडिओ पाहून तपास न करता कारवाई करण्याची ही घटना असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लंका दहन करण्यापूर्वीच हनुमान बनलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू; शेपटीला आग लावताच असं काही घडलं की…

संबंधित बातम्या

Video: माउंटेन सिंहाने ‘भुताचा’ आवाज काढताच पोलीसाला फुटला घाम; थेट पळत सुटला अन..
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
Video: पेट्रोल भरण्यासाठी केलेली घाई पडली महागात; बाइकचा तोल गेला अन्…
OTT वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! Amazon Prime, Disney+Hotstar सब्सक्रिप्शन मिळणार मोफत, असे करा Login
अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्…; पाहा Viral Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : राज्यातील पर्यटन वाढेल?
मराठा आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिका रखडली; तांत्रिक बाबींमुळे संभ्रम
म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात
अन्न व औषध प्रशासनातील ५० टक्के पदे रिक्त!; प्रतिनियुक्तीचा आयुक्तांचा प्रस्ताव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी