Bantoge toh Katoge slogan on Wedding Card: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनात यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक है तो सेफ है, असा नारा दिला. विरोधकांनी या नाऱ्यावर जोरदार टीका केली असली तरी भाजपाकडून मात्र या नाऱ्याचा नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचे काम केले जात आहे. “बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा सर्वप्रथम हरियाणाच्या निवडणुकीत देण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये याची पुनरावृत्ती केली जात आहे. आता ही घोषणा फक्त निवडणुकीपुरती मर्यादित राहिली नाही. तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याने यापुढे जाऊन ही घोषणा थेट लग्नपत्रिकेवर टाकली आहे. सदर लग्नपत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा >> धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षावर रितेश देशमुखची ‘लय भारी’ टीका; म्हणाला, ‘सरकार येणार तर महाविकास आघाडीचेच’

Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
Eknath Shinde Name is not on CM Oath Ceremony Invitation Card
Uday Samant: ‘तीनही पक्षांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नावच नाही’, तर उपमुख्यमंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा इशारा; म्हणाले, “शिंदेंना डावलून…”
uday samant on social viral card
‘लोकसत्ता’च्या नावे उदय सामंतांची बदनामी करणारं कार्ड समाजकंटकांकडून व्हायरल; ‘कायदेशीर पाऊल उचलणार’, सामंत यांचा इशारा!
Sobhita Dhulipala Pelli Kuthuru Ceremony
नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधण्याआधी सोभिताने शेअर केले ‘पेल्ली कुथुरु’ समारंभाचे फोटो; ही तेलुगू प्रथा आहे तरी काय?

२३ रोजी निकाल आणि त्याच दिवशी लग्न

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. जी लग्नपत्रिका व्हायर होत आहे, त्यावर लग्नाची तारीखही २३ नोव्हेंबर अशी आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील भाजपाच्या एका कार्यकर्त्याने आपल्या भावाच्या लग्नाची पत्रिका छापताना त्यावर ‘बटोगे तो कटोगे’ अशी घोषणा छापली आहे. तसेच या घोषणेसह पंतप्रधान मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो छापला आहे. गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्याने छापलेली ही लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लग्नपत्रिकेवर अयोध्येतील श्रीराम मंदिराचाही फोटो छापला आहे.

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावल्यानंतर तिथे अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरू झाले. या परिस्थितीचा हवाला देत योगी आदित्यनाथ यांनी हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. हिंदूंनी एकसंघ राहण्याचा आणि एकगठ्ठा मतदान करण्याचा सूचक इशारा योगी आदित्यनाथ यांनी या नाऱ्यातून दिला. योगायोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाले. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही याचीच पुनरावृत्ती केली जात आहे.

दरम्यान सदर नारा लग्नपत्रिकेवर छापणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याने म्हटले की, हिंदू समाजात फूट पडत चालल्याचे माझ्या निदर्शनास आले. हिंदूमध्ये संघटितपणा नाही. मोदीजी आणि योगीजी यांची भाषणे ऐकून मला प्रेरणा मिळाली. त्यातून मग माझ्या भावाच्या लग्नात मी पत्रिकेवर सदर नारा छापून घेतला.

Story img Loader