Mohit Kamboj News: उद्धव ठाकरे यांनी २९ जूनच्या रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने सरकार अल्पमतात आलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पदाचा त्याग केला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर त्याच रात्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींदरम्यान भाजपा नेते मोहित कम्बोज यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचं स्विकारा,” शिंदे गटाचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले “उद्धव ठाकरेंची प्रतिमा…”

या व्हिडीओत मोहित कम्बोज यांनी ठाकरे सरकारला ठाकरे सरकारला “३० जून माझी तारीख असेल, १ जुलै उजाडू देणार नाही” असा इशारा दिला होता. मोहित कम्बोज यांनी दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरल्याने आश्चर्य व्यक्त आहे. तर दुसरीकडे त्यांना या सर्व घडामोडींची आधीच कल्पना होती का? असाही संशय व्यक्त होत आहे.

काय म्हणाले होते मोहित कम्बोज

“मला ना अपमानाची भीती आहे, ना सन्मानाची इच्छा आहे. ही लढाई सुरु राहणार आहे. ज्यांनी हे सर्व रचलं आहे त्यांना सांगतो, १ जून तारीख तुमची होती, ३० जून तारीख माझी असेल. १ जुलै उजाडू देणार नाही. मीडियाकडून हे ऐकून घ्या. महादेवाची शप्पथ घेतो, मीदेखील उत्तर भारतीय आहे,” असं मोहित कम्बोज म्हणाले होते.

नेमकं काय झालं होतं?

मोहित कम्बोज यांच्यावर कर्ज बुडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मोहित कम्बोज यांच्यासहिक त्यांच्या कंपनीच्या संचालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहित कम्बोज यांच्या कंपनीने ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज फेडलं नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसंच कर्ज ज्या कारणासाठी घेतलं होतं त्यासाठी वापरलं नसल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईनंतर बोलताना मोहित कम्बोज यांनी इशारा दिला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader mohit kamboj viral video 30 june eknath shinde uddhav thackeray sgy
First published on: 01-07-2022 at 12:10 IST