भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर २०२० रोजो) राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी आंदोलनं केली. मुंबईमध्येही सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपाच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.काहीही झालं तरी आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करणार अशी भूमिका घेणाऱ्या भाजपाच्या काही नेत्यांना कार्यकर्त्यांसहीत पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र या सर्व प्रकरणामध्ये तोंडावरील मास्क निघाल्याचे प्रसाद लाड यांना एका पत्रकाराने लक्षात आणून दिलं. त्यानंतर लाड यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन मास्क न घातल्याबद्दल दंड भरल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. मात्र ही माहिती देताना त्यांनी कॅप्शनसाठी वापरलेल्या हिंदीवरुन त्यांना सध्या ट्रोल केलं जातं आहे. प्रसाद लाड यांनी मास्क न घातल्याबद्दल २०० रुपये दंड भरल्याच्या पावतीचा फोटो ट्विट करुन घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती दिली आहे. मात्र या फोटोला कॅप्शन देताना हिंदीतील काही शब्द चुकीचे टाइप झाले आहेत. "गलती को माफी नहीं, हम कोई भी हो न्याय व्यवस्था सबसे बडी है. आंदोलन मे पोलीस कि दडपशाही कारण मेरा मुह: का मास्क निच्ये आया मुझे ये बात झी न्यूज ने नजर में लाई मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द महानगर पालिका कार्यालय जाके खुद जुर्माना भर दिया..", अशी कॅप्शन लाड यांनी या फोटोला दिला आहे. लाड यांनी दिलेल्या कॅप्शनमध्ये मास्क निचे ऐवजी 'निच्ये' आणि गलती ऐवजी 'गळती' अशा शब्द टाइप झाला आहे. यावरुनच आता त्यांना हिंदी भाषेच्या वापरासाठी ट्रोल केलं जात आहे. लाड यांच्या ट्विटवर अनेकांनी त्यांनी वापरलेल्या हिंदीसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पाहुयात नक्की काय म्हटलं आहे युझर्सने. १) रोज एक हिंदीत ट्विट करा मुद्दा काहीही असो पण मुह: का मास्क निच्ये आया ये गळती है सर या हिंदी मध्ये रोज एक ट्विट करत जा . लई भारी अफलातून .. you made my day.@jogalshailaja — नकली दादा कोंडके (@dadak0ndke) October 13, 2020 २) जबरदस्ती कोणी केलीय? गळती हिंदी लिहायची जबरदस्ती कोणी केली तुमच्यावर आधी ते सांगा. — (@KiranRJadhav) October 14, 2020 ३) माणसाकडून झाली गळती गळती हो जाती है माणसाकडून — sid (@SiddharthAB33) October 14, 2020 ४) भाषेलाच गळती लागली महाशयांनी ट्विट केलंच तेही मराठी सोडून हिंदी भाषेत आणि त्या भाषेला गळती लावायच कामं चालू केलं — Roshan Mahalle. (@Sarkar_09) October 13, 2020 ५) आमची करमणूक लाड साहेब तुम्ही हिंदीत रोज एक तरी ट्विट करीत जा लै मस्त हिंदी आहे तुमची काय होईल लिहून लिहून तुमची हिंदी सुधारेल आणि तितके दिवस आमची ही करमणूक होईल . — GDP तावडेकर (@AoYnBo5TwXFp2IA) October 13, 2020 ६) झेपत नाय तर. आर झेपत नाय हिंदी तर मराठीत लिहावं — अजित सुरेखा आण्णासाहेब शिंदे (@Ajitshinde_28) October 13, 2020 ७) एक गळती की ताकद एक गळती की ताकद तुम क्या जानू (?) प्रसाद बाबू — D_savage (@Cooldt_) October 14, 2020 ८) पोलिस की दडपशाही पोलिस की दडपशाही — डॉ राजेंद्र तारे (@RajendraTare) October 14, 2020 ९) मराठी भय्या जीव देतील मेरा मुह: का मास्क निच्ये आया, मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे का हिंदी ट्विट केलंस रे भावा मराठी भय्या जीव देतील की रे — दत्तू गवाणकर (@GavankarDattu) October 13, 2020 १०) कारवाई होणार का? महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार महाराष्ट्राच्या राज्यभाषेत व्यक्त का होत नसावेत? ज्या राज्याचा पगार घेतात त्या राज्याची भाषा वापरली पाहिजे हे त्यांना त्यांच्या चाहत्यांनी सांगायला हवं. @CMOMaharashtra @Subhash_Desai यावर राज्यभाषा न वापरल्याबद्दल कारवाई होईल का? — #मराठीबोलाचळवळ (@marathi_bola) October 13, 2020 ११) हिंदीची चिंधी हिंदीची चिंधी. झेपत नसलं, आपली लाज जात असली तरी वरिष्ठांना खुश करायला मराठीऐवजी हिंदी रेटायची खाज काही जात नाही. — प्रथमेश शिरवडकर (@prathameshs1189) October 13, 2020 १२) लिकेज शोधून गळती बंद केली पाहिजे लिकेज शोधून गळती बंद केली पाहिजे लवकरात लवकर!#म — भटका जीव (@IndurkarVaibhav) October 13, 2020 १३) अरुण गवळी पण. गलती को माफी नाहीं . हिंदी नाही जमत तर मराठीत बोलावं साहेब अरुण गवळी पण ज्याम हासले असतील राव " गलती को माफी नाहीं " हे ऐकून #चुकीला_माफी_नाही — Adi Kandre (@AdiKandreSpeaks) October 14, 2020 १४) गळती झाली त्यांची गळती झाली त्यांची, माफ करा त्यांना! @PrasadLadInd साहेब, आपली मायबोली मराठी सर्वगुणसंपन्न असताना तुम्हाला हिंदी वापरण्यात काय धन्यता वाटते समजत नाही? तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आमदार आहात हे विसरलात का आपण? #निषेध#म #मराठी #महाराष्ट्रातफक्तमराठीच #StopHindiImposition — अक्षय वाघ - Akshay Wagh APW (@APW_Akshay_Wagh) October 14, 2020 १५) मिम pic.twitter.com/IwPaCwUu8K — सुशिक्षित बेरोजगार (@be_rose_gaar) October 13, 2020 १६) गळती को सुधारणा चाहिये वारणा पाणी बेहे जाता है. सही हे, "गळती" को सुधारणा चाहिये वारणा पाणी बेहे जाता हे. — शैलेश (@sshailesh123) October 14, 2020 १७) मनोरंजनात कसलीच कमी नाही भाजप मध्ये कोणी शहाणं आहे का? सगळे जोकर भरलेत, मनोरंजनात कसलीच कमी नाही — शुभम | Shubham N (@Nashik_Shubham) October 14, 2020 १८) ऐसे कैसे गळती होणे देता तुम? गळती को प्रतिबंध होना. ऐसे कैसे गळती होणे देता तुम? — Susheel (@hpsonar) October 13, 2020 १९) हे लाड साहेब तर. भाजपा मध्ये वाघ साहेब आणि भातखळकर हे दोनच #शिरोमणी आहेत असं वाटत होतं ते साफ चुकीचे आहे. हे लाड साहेब तर त्यांच्या पुढचे दिसतेत. — Shr!kant DaphaL पाटील (@Shrikant_Daphal) October 14, 2020 २०) गडकरी बरोबर बोलले होते. दोन वाक्ये नीट लिहिता येत नाहीयेत, कुणी आमदार केलं यांना? गडकरी बरोबर बोलले होते, ज्यांची सरपंच व्हायची लायकी नाही असे लोक भाजपमध्ये आमदार खासदार झालेत.. — सुजित जाधव एकंदरितच या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी लाड यांची चांगलीच खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. एकूण रिट्विटपैकी अनेक कोटेड ट्विट हे या हिंदीबद्दलच आहेत.