BJP Women Leaders Fight Viral Video: दोन महिला एकत्र आल्या की कधीच शांतता नसते असं म्हणतात. असं म्हणणं खरंतर कितीही टाळलं तरी एखादा टक्का तरी खरंच आहे. जर त्या दोघी मैत्रिणी असतील तर त्यांच्या मस्करीने, गप्पांनी आणि जर त्या एकमेकांच्या कट्टर शत्रू असतील तर भांडणाने आजूबाजूचा परिसर दणाणून उठतो. असाच काहीसा प्रकार सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपच्या दोन महिला कार्यककर्त्या एकमेकींशी नळावर भांडतात अशा सुरात वाद घालत आहेत. राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप कार्यक्रम पन्ना एलसीएलएन येथे प्रेक्षकांच्या समोरच या दोन बायकांची जुंपली पाहायला मिळाली.
मध्य प्रदेशातील पन्ना येथील हे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिस्त आणि स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात मंचावर उपस्थित दोन महिला नेत्या एकमेकांना भिडल्या. हाणामारीमध्ये एकीने दुसरीला जोरात कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळत आहे.
पन्ना येथे 25 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रादेशिक खासदार व्हीडी शर्मा यांना खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवराज सरकारचे कृषी मंत्री कमल पटेल, कामगार मंत्री ब्रिजेंद्र सिंह आणि स्थानिक आमदार संजय पाठक देखील उपस्थित होते.
कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावर बसलेली एक महिला भाजप कार्यकर्ती आपल्या खुर्चीवरून उठली आणि शेजारी बसलेल्या अन्य एका महिला कार्यकर्तीशी वाद घालू लागली. या दोघींचा वाद नेमका कशावरून सुरु झाला हे जरी कळलं नसलं तरी या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. ही घटना पाहताच कार्यक्रमात काही क्षण शांतता पसरली. हाणामारी वाढत असल्याचे पाहून अन्य नेत्यांनी मध्यस्थी करत दोन्ही महिलांमधील वाद मिटवला.
भाजपा महिला कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
हे ही वाचा<< लग्नाचं विचारताच भडकला बॉयफ्रेंड; भररस्त्यात तरुणीला मारहाणीचा Video झाला Viral; तोंडावर पाय दिला अन्..
या दोन महिला नेत्यांमध्ये ही धक्काबुक्की सुरू असताना, भाजपचे सर्व प्रमुख नेते व्यासपीठावरून निघून गेले. सध्या भाजपचा एकही नेता या प्रकरणी काहीही प्रतिक्रिया देण्यासाठी तयार नाही.