Black Bear Attack Keeper Video Viral : अस्वल हा राक्षसी प्राणी आहे, जो मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारचे अन्न आवडीने खातो. त्यांच्याबाबत सर्वांत भीतीदायक गोष्ट म्हणजे बहुतेक अस्वलं नरभक्षक असतात, जी संधी मिळाल्यास माणासाची शिकार करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका नरभक्षक अस्वलाचा धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील एक कर्मचारी कशा प्रकारे अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी धावतोय हे दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हिडीओमध्ये एक कर्मचारी प्राणीसंग्रहालयातील अस्वलाच्या पिंजऱ्यातून जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्राणीसंग्रहालयात एक कर्मचारी आणि एक अस्वल आधीपासूनच उपस्थित असल्याचे दिसतेय. त्यावेळी तिथे दुसरा एक कर्मचारी जीव तोडून पळत गेटजवळ येताना दिसतोय. कारण- एक नरभक्षक अस्वल त्याच्या पाठीमागे लागला होता. अस्वल काही केल्या त्या कर्मचाऱ्याला पाठलाग करणं सोडत नाही, कर्मचारी धापा टाकत आपला जीव वाचवण्यासाठी पिंजऱ्यात इकडे-तिकडे धावत सुटतो. यावेळी दुसरा एक कर्मचारी हातात काठी घेऊन, त्या नरभक्षक अस्वलावर हल्ला करतो, जेणेकरून ते अस्वल दूर पळून जाईल; पण ते काही केल्या त्या कर्मचाऱ्याचा पाठलाग करणं सोडत नाही.
अस्वलाने हल्ल्यासाठी केला कर्मचाऱ्याचा पाठलाग, व्हिडीओ व्हायरल
खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर दोन्ही कर्मचारी पिंजऱ्यातील एका दरवाजातून बाहेर पडून आपला जीव वाचवतात; पण अस्वल त्या दरवाजावरही हल्ला करते.
नरभक्षक अस्वलाचा हा व्हिडीओ malak_pets नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेक जण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरनं लिहिलं, “त्यानं नक्कीच अस्वलाबरोबर काहीतरी खोडसाळपणा केला असेल, म्हणूनच तो त्याच्या मागे लागला आहे.” दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, “एका जंगली प्राण्यासमोर जायची गरजच काय?” शेवटी एकानं लिहिलं, “अरे देवा, त्याला वाचवा; नाही तर अस्वल त्याला ठार मारेल.”
