scorecardresearch

अरे डोळे दुखले रे! पॉर्नस्टार Johnny Sins रणवीर सिंगबरोबर मालिकेत करतोय काम; मिम्स पाहून व्हाल हैराण

रणवीर सिंग या अभिनेत्याने जॉनी सीन्ससह मिळून लैंगिक आरोग्यासंबंधी एका जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या याच व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे, कारण आणि व्हिडीओ पाहा.

Ranveer Singh collaborated with Johnny Sins for an ad memes
रणवीर सिंगने, जॉनी सीन्ससह केलेल्या जाहिरातीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा [Photo credit -Instagram]

रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील सध्याचा सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचा अभिनय आणि तडफदार नृत्यापासून ते त्याच्या चित्रविचित्र ‘फॅशन सेन्स’पर्यंत सर्व गोष्टींसाठी तो प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या तो एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आलेला आहे. ती गोष्ट म्हणजे, लैंगिक आरोग्यासंबंधी [sexual wellbeing] केलेली जाहिरात. मात्र, या जाहिरातीला नेटकऱ्यांनी एवढे व्हायरल किंवा डोक्यावर का बरे उचलून घेतले आहे ते पाहू.

ही जाहिरात एखाद्या हिंदी मालिकेप्रमाणे बनवण्यात आली आहे. यामध्ये रणवीर सिंगसह, जॉनी सीन्स असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. जॉनी सीन्स हा अमेरिकन पॉर्नस्टार आहे. त्यामुळे या हिंदी जाहिरातीत त्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या जाहिरातीमध्ये जॉनी सीन्सची बायको त्याच्याबरोबर लग्न करून सुखी नसल्याचे रणवीर सिंगला सांगते. त्या दोघांचे लग्न वाचवण्यासाठी रणवीर सिंग त्यांच्या समस्येवर उपाय म्हणून जॉनी सीन्सला लैंगिक आरोग्य सुधारण्याची गोळी देतो.

Shahrukh Khan Qatar PM
“मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा
Eknath Khadse Ashok Chavan
अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर एकनाथ खडसेंची फेसबूक पोस्ट व्हायरल; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी…”
Mauris Noronha
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर चार दिवसांनी मॉरिसच्या पत्नीचा गौप्यस्फोट! म्हणाली, “मॉरिस व्हिलन…”
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
“…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?

हेही वाचा : तुम्ही ‘Unhealthy relationship’ मध्ये आहेत का? हे ओळखण्यासाठी ‘या’ चार टिप्स लक्षात ठेवा…

पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारणाऱ्या गोळीची ही जाहिरात असल्याचे सर्वात शेवटी आपल्याला समजते. मात्र, अभिनेता रणवीर सिंगने ही जाहिरात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रचंड प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर अनेकांनी यावर तऱ्हेतऱ्हेचे मिम्सदेखील बनवलेले आहे. नेटकरी यावर नेमके काय म्हणतात ते पाहू.

“हे काय पाहिलं मी!! रणवीर सिंग एकता कपूरच्या मालिकांमध्ये कसा दिसेल याबद्दल मी विचार केला होता. पण, जॉनी सीन्सचा तर मी स्वप्नातही विचार केला नव्हता”, असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “याचे अजून एपिसोड्स कुठे आहे? मला किमान १० सीजन तरी हवे आहे!” असे म्हटले आहे. तिसऱ्याने, “मजा मस्करी करत खूप महत्वाचा संदेश रणवीर सिंगने समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.” असे लिहिले आहे.

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया पाहा :

अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओला आत्तापर्यंत १३.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर जाहिरातीवर ५४८K लाईक्स आणि २६.६K कमेंट्स आलेल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actor ranveer sing collaborated with porn star johnny sins for a sexual wellness ad watch netizens reactions and memes dha

First published on: 12-02-2024 at 19:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×