जनरेशन झेड किंवा ज्यांना आपण जेन झी म्हणतो अशा मुलांची उत्तरंही अनेकदा चर्चेत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कंपनीत काम करणाऱ्या जेन झी मुलीने बॉसला दिलेलं हे उत्तर व्हायरल झालं आहे. मला काही फरक पडत नाही म्हणत या मुलीने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंटही येत आहेत.

काय आहे या व्हिडीओत?

सिमरन नावाच्या मुलीने रितसर सुट्टी घेतली आहे आणि ती प्रवासाला निघाली आहे. मात्र ऐनवेळी तिच्या मॅनेजरने तिला फोन केला आणि सांगितलं की तुझी रजा रद्द झाली आहे. त्यावर तिने सांगितलं आय डोन्ट केअर. या मुलीने दिलेलं हे उत्तर व्हायरल झालं आहे. या मुलीचं म्हणणं आहे की मी माझ्या सुट्टीबाबत मॅनेजरला पूर्वकल्पना दिली होती. आता मी विमानळावर आहे आणि मला मॅनेजर सांगतोय सुट्टी मिळणार नाही. मला आता काही फरक पडत नाही असं या मुलीने व्हायरल व्हिडीओत म्हटलं आहे.

सिमरन या मुलीने नेमकं काय म्हटलंय?

सिमरन असं या मुलीचं नाव आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ती म्हणते आहे की बॉसने अचानक मला आत्ता सांगितलं की तुझी सुट्टी रद्द. मी रितसर अर्ज करुन सुट्टी घेतली आहे. तरीही मला ऐनवेळी सांगण्यात आलं आहे की तुझी सुट्टी रद्द. मला काही फरक पडत नाही. मी सुट्टीवर चालले आहे. आय डोन्ट केअर असं या मुलीने म्हटलं आहे. सिमरन असंही म्हणाली आहे की कंपनीत इमर्जन्सी आली असेल, पण माझं म्हणणं हे आहे की तुम्ही रितसर अर्ज केलेल्या व्यक्तीला कसं काय फोन करुन बोलवू शकता? शिवाय असं कसं काय म्हणू शकता की सुट्टी रद्द? मग सुट्टी दिलीच कशाला? कामावर असताना आम्ही १०० टक्के कामच करत असतो. सुट्टीवर आल्यानंतर असा का त्रास देत आहेत? शेवटच्या क्षणी जर असं बोलवलं तर कसं काय जाणार? काय व्हायचं ते होऊदेत.. मी माझी सुट्टी एंजॉय करणार आहे असं सिमरनने म्हटलं आहे.