Boy Carrying Sister Is Not from Nepal Floods : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरुामध्ये हजारो लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाले. कोणी बेघर झाले तर कोणी आपलं कुटुंब गमावले. या विनाशानंतर कित्येक व्हिडीओ समोर येत आहे जे लोकांना हादरवून टाकणारे आहेत. दरम्यान अशाच एका चिमुकल्या बहिण-भावंडाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून तो नेपाळच्या महापुराच्या नावाखाली शेअर केला जात आहे पण या व्हिडीओचे सत्य मात्र वेगळे आहे.
व्हिडीओमध्ये एक चिमुकला मुलगा आपल्या चिमुकल्या बहिणीला पाठीवर घेऊन चालत येताना दिसतो. त्याच्या चेहरा अन् शरीरावर जखमा दिसतात. दोन्ही मुलं एका डोंगराळ भागातील कच्या वाटेवरून जाताना दिसता. हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचा दावा केला जात आहे पण हे सत्य नाही. नेपाळच्या महाप्रलयाच्या नावाखाली हा व्हिडीओ शेअर केल जात आहे.
काय आहे सत्य?
साधारण २६ सेकंदाच्या हा व्हिडीओ ३० ऑगस्टला एक्सवर कित्येक लोकांनी शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ नेपाळमधील नाही तर व्हिएतनाममधील आहे. सध्या कित्येक पोस्टमध्ये हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचा दावा करून शेअर केला जात आहे. या पोस्टमध्ये आपल्या चिमुकल्या बहिणीला सांभाळत हा छोटा भाऊ आपल्या आईवडिलांचा शोध घेतल असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी तो शेअर केला आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या.
पाठीवर चिमुकली बहिण अन् चेहऱ्यावर जखमा
व्हिडीओमधील मुलगा वयाने देखील खूप लहान आहे. तरीही तो आपल्या चिमुकल्या बहिणीची काळजी घेत आहे. तिला पाठीवून घेऊन तो फिरत आहे. व्हिडीओमध्ये हिरवळ, शेती आणि कच्चा मातीचा रस्ता आणि ग्रामीण भाग दिसत आहे. पण हा व्हिडीओ नेपाळमधील नाही.
ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाइजची नेटकऱ्यांना झाली आठवण
व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तो नेपाळमधील असल्याचा गैरसमज करून घेत त्यावर प्रतिक्रिया देण्यास आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तसेच काही लोक याया दृश्याची तुलना इसाओ ताकाहाता दिग्दर्शित आणि स्टुडिओ घिबली निर्मित १९८८ च्या ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाइज’ या ॲनिमेटेड जपानी चित्रपटाशी केली जात आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडणाऱ्या या चित्रपटात, सेइता आणि सेत्सुको ही भावंडे आपल्या कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर जगण्यासाठी संघर्ष करताना दाखवली आहेत. मोठा भाऊ सेइता, आपल्या लहान बहिणीची जबाबदारी स्वीकारतो आणि ते आपल्या सभोवतालच्या विध्वंसाचा सामना करत असतात. मात्र, हा व्हिडिओ नेपाळमधील पुराचा नसून उत्तर व्हिएतनाममधील हा गियांग या प्रांतातील आहे. ‘द स्टेट्समन’च्या वृत्तानुसार, मूळ व्हिडिओ व्हिएतनाममधील हा गियांग येथे थियेन डुयेन या कंटेंट क्रिएटरने चित्रित केला होता.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एकाने हा व्हिडीओ नेपाळच्या प्रलयातील असल्याचे समजून व्हिडीओवर कमेंट केली की,“शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो अजूनही बेपत्ता आहेत. अनेक कुटुंबे अजूनही शोध घेत आहेत. कृपया या मुलांना आणि प्रत्येक बाधित कुटुंबाला तुमच्या विचारात ठेवा. शेअर करा जेणेकरून ते काय अनुभवत आहेत हे अधिक लोकांना दिसेल.”
कांही जपानी चित्रपटाचा उल्लेख करत म्हटले की, “यामुळे ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाइज’ची आठवण येते – दुसऱ्या महायुद्धाच्या उद्रेकादरम्यान दोन भावंडे एकत्र राहण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष करतात.”
आणखी एकाने लिहिलेकी “मला ‘ग्रेव्ह ऑफ द फायरफ्लाइज’ची आठवण येते. तसेच, ही तीच मुले आहेत ज्यांना युनायटेड स्टेट्स ऑफ पी३डीओएस (United States of P3d0s) नेहमी त्यांच्या स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि मिशनऱ्यांमार्फत शोधत असते. हा मुलगा आणि त्याची बहीण त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त धोक्यात आहेत.”
चीन-तिबेट सीमेजवळ एक हिमनदी कोसळल्याने गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये ही आपत्ती कोसळली, ज्यामुळे आलेल्या पुरात ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि भारतीयांसह हजारो लोक बेपत्ता झाले.
