किंग कोब्राला ‘सापांचा राजा’ म्हटले जाते. हा पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राणी आहे. त्याच्या चाव्याने मृत्यू हा अटळ असतो. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्रा आणि एका मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे , जो पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर एक मुलगा किंग कोब्राला हातात घेऊन नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा निव्वळ मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा किंग कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. दोन मुलंही शेजारी उभी असलेली दिसतात. यादरम्यान, हा मुलगा ज्या पद्धतीने कोब्रा हातात घेऊन नाचतो, ते पाहून नेटकऱ्यांनी त्याला विक्षिप्त म्हटले आहे. कोब्रा खूप मोठा आणि धोकादायक दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीतीचे कोणतेही चिन्ह नाही. तो बिनधास्तपणे कोब्रा पकडतो आणि मग त्याच्यासोबत नाचू लागतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोब्रा देखील मुलाला इजा करत नाही. चला तर मग हा व्हिडिओ पाहूया.
( हे ही वाचा: धगधगता ज्वालामुखी आणि त्यावरती दोरीवर चालणारी दोन मुलं…आयुष्यात इतकं भयानक दृश्य कधीही पाहिलं नसेल)
कोब्रासोबत नाचणाऱ्या मुलाचा व्हिडिओ येथे पहा
व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की या कोब्राने मुलाला चावले असते तर काही सेकंदात त्याचा मृत्यू झाला असता. पण तो मुलगा बेधडकपणे त्याला हातात धरून पुन्हा पुन्हा तिच्यासोबत नाचू लागतो. हा व्हिडीओ खरोखरच आश्चर्यकारक आहे, कारण अशी दृश्ये क्वचितच पाहायला मिळतात.
( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)
कोब्रासोबत नाचणाऱ्या मुलाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर earth.reel नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, हा मुलगा अखेर काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या कंमेंट करत आहेत. एका युजरवर कमेंट करताना तो मुलगा आत्महत्या करण्याच्या मूडमध्ये असल्याचं दिसत आहे.