तामिळनाडूच्या कोडाईकनाल जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना घडली आहे. एका धबधब्यावर फोटो घेण्याच्या नादात २८ वर्षीय तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना या तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. अजय पंडियन असे या तरुणाचे नाव असून तो अद्यापपर्यंत बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

झोपलेल्या मालकाला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली ही अजब पद्धत; VIRAL VIDEO पाहून आवरणार नाही हसू

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

४७ सेकंदांचा हा व्हिडिओ तीन ऑगस्टचा असून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  या व्हिडिओमध्ये बेपत्ता तरुण धबधब्याच्या अतिशय जवळ असलेल्या दगडांवर उभा राहून पोझ देताना दिसत आहे. धबधब्याची खोली आणि पाण्याचा खळखळाट नीट शूट व्हावा, यासाठी हा तरुण त्याच्या मित्राला हातवारे करताना देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचदरम्यान दगडांवरून पाय घसरल्याने संतुलन राखण्याचा या तरुणाने प्रयत्न केला. मात्र, निसरड्या दगडांवरुन अवघ्या तीन ते चार सेकंदामध्ये तो धबधब्यात कोसळला आणि नाहीसा झाला.

सरकारी अधिकाऱ्याने गजब कारणासाठी मागितली रजा, म्हणतो रुसलेल्या बायकोला परत…

ही घटना घडताच व्हिडिओ शूट करणाऱ्या मित्राने किंचाळत तामिळ भाषेत ‘माचा’ अशी हाक दिली. मात्र, तोवर अजय पाण्यामध्ये वाहून गेला होता. अजयचा मित्र कल्याणसुंदरमने घटनेची माहिती देताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बचाव पथकाच्या माध्यमातून अजयचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, तो अद्यापपर्यंत बेपत्ता आहे.