Viral video: अनेकदा क्षुल्लक कारणावरून झालेला वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यातही कॉलेज भांडणाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. कधी बॉयफ्रेंडवरून, तर कधी जेलसीवरून तर कधी रस्त्यावर ही भांडण पाहायला मिळतात. अशातच कुणी भांडणाचा व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाकल्यानंतर चांगलाच व्हायरल होतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला निर्दयीपणे मारहाण केली आहे. हा शॉकिंग व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. भररस्त्यात एका तरुणाने वयस्कर व्यक्तीला मारहाण केली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण आणि वयस्कर व्यक्ती समोरासमोर येतात. तरुण वयस्कर व्यक्तीला मारहाण करू लागते. ती व्यक्ती तरुणाला प्रतिकार करण्याचा आपल्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. पण तरुणाच्या ताकदीपुढे त्याचं काही चालत नाही. इतक्या एक दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीच्या मदतीला धावून येते. मात्र तू इथे का आलास असे म्हणत वृद्धाला तरुणानं मारहाण चालूच ठेवली. वृद्धाच्या बचावासाठी आलेली व्यक्ती त्या निर्दयी तरुणासमोर उभी ठाकते आणि आपल्याला मारण्याचं आव्हान देते. वृद्धाला मारहाण करणारा तरुणही थोडावेळ घाबरतो मात्र पुन्हा शेवटी त्या दोघांमध्ये लढाई होते. यावेळी एक महिला त्यांच्यातील भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करते. पण दोघंही ऐकत नाहीत. अखेर ती महिलाही बाजूला होते. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> Apple iPhone 15 ची विक्री सुरू होताच मॉलमध्ये चेंगराचेंगरी; लोकांना रोखताना सुरक्षा रक्षकांना फुटला घाम; VIDEO व्हायरल सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. लहान मुलांचे, माहितीपूर्ण, प्राण्यांचे, अपघाताचे किंवा स्टंट करताना धक्कादायक आणि भीतीदायक व्हिडीओ पाहिला मिळतात. सोशल मीडियावर हा अनेक वेगवेगळ्या व्हिडीओचा खजिना आहे.