Boy Saving Old Man Video Viral: सध्या रीलच्या जमान्यात अनेकजण दुसऱ्या व्यक्तीचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ बनवताना दिसतात. असे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावरही व्हायरल होतात. ज्यात कोणतरी चालत्या ट्रेनमध्ये किंवा मेट्रोमध्ये नाचतायत, तर कधी रस्त्याच्या मध्यभागी किंवा सार्वजनिक ठिकाणी विचित्र कृत्य करताना दिसतात. या रिलच्या नादात अनेकांनी आत्तापर्यंत जीव गमावल्याचे आपण ऐकले. पण रिलमुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? वाचताना थोड विचित्र वाटेल पण प्रत्यक्षात अशी घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वे प्लॅटफॉर्मवर नाचत आहे, याचवेळी एक ट्रेन त्याच्या जवळून जात आहे, तेव्हा एक वृद्ध चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना प्लॅटफॉर्मवर पडतो, यानंतर पुढे काय घडते पाहा व्हिडीओमध्ये…

रीलमुळे वाचला जीव

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक तरुण चालत्या ट्रेनच्या अगदी जवळ उभा राहून डान्स करत रील व्हिडीओ शूट करत आहे. यावेळी अचानक समोरून एक वृद्ध ट्रेनमधून पडला. सुदैवाने, तरुण रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणी उभा राहून रिल बनवत होता अगदी तिथेच येऊन हा वृद्ध पडला ज्यामुळे तरुणाने पटकन त्यांना पकडले आणि बाजूला खेचले, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला.

हा व्हिडिओ X वर @Bhincharpooja नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कधीकधी रील बनवणारेही मदतीला येतात, रीलमुळे एका वृद्धाचा जीव वाचला.’

Read More News On Trending : आंध्र प्रदेशात राजकीय भूकंप! चंद्राबाबू नायडूंनी सोडली एनडीएची साथ? व्हायरल Photo नेमका कधीचा? सत्य आलं समोर

लोकांनी तरुणाचे केले कौतुक

हा व्हिडीओ @Bhincharpooja नावाच्या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणाच्या प्रजेंस ऑफ माइंडचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘आज छपरी भाई,माझ्या हृदयात तुमच्या सर्वांबद्दल थोडा आदर वाढला आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ‘पण अशी शक्यता फारच कमी असते.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ह्यांचा काहीतरी उपयोग झाला’ अनेकांनी तरुणाने केलेल्या मदतीची स्तुती केली आहे.