पुरणपोळीचे जेवण, टोपी घालून मानपान; मोलकरणीने दिलेली Farewell Party पाहून तुम्हीही व्हाल भावूक | Boy receives farewell from his maid house help emotional viral video wins internet | Loksatta

पुरणपोळीचे जेवण, टोपी घालून मानपान; मोलकरणीने दिलेली Farewell Party पाहून तुम्हीही व्हाल भावूक

नेटकऱ्यांना भावलेला फेअरवेल पार्टीचा Viral Video एकदा पाहाच

Boy receives farewell from his maid house help emotional viral video wins internet
या व्हायरल व्हिडीओमधील मोलकरणीचा आदरातिथ्याने जिंकली नेटकऱ्यांची मनं (फोटो : सोशल मीडिया)

शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त अनेकजणांना घरापासून लांब एखाद्या दुसऱ्या शहरात किंवा देशात स्थलांतर करावे लागते, म्हणजे नव्या ठिकाणी राहायला जावे लागते. नव्या ठिकाणी राहायला जाण्यापुर्वी अशा व्यक्तींना त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींकडून किंवा कुटुंबाकडून त्यांना फेअरवेल पार्टी दिली जाते. ही पार्टी त्यांच्या नव्या आयुष्याच्या सुरूवातीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आयोजित केली जाते. तुम अशा फेअरवेल पार्टीचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एका अनोख्या फेअरवेल पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ अनिश भगत या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. अनिशला कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहायला जावे लागत असल्याचे तो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो. तो जाण्यापुर्वी त्याची मोलकरीण एका फेअरवेल पार्टीचे आयोजन करते, त्या फेअरवेल पार्टीला जात असल्याचे तो व्हिडिओमध्ये सांगत आहे. पुरणपोळीचे जेवण, टोपी घालून मानपान आणि या गोड फेअरवेल पार्टीची कायम आठवण राहावी यासाठीचा सर्वांसोबतचा सेल्फी अशी ही अनोखी फेअरवेल पार्टी तुमचंही मन जिंकेल. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : अजबच! सरकारी अधिकाऱ्यापुढे कुत्र्यासारखा भुंकू लागला हा माणूस; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

व्हायरल व्हिडीओ :

या व्हिडीओला ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या मोलकरणीच्या आदरातिथ्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2022 at 15:37 IST
Next Story
“वो चाहे ना चाहे”, मी तर चहाची टपरी चालवणारंच, ‘M बेवफा चहावाल्याची’ अजब प्रेमकहाणी वाचाच एकदा