scorecardresearch

‘लग्नासाठी पाहिजे सरकारी नोकरीवाली मुलगी, हातात पोस्टर घेऊन भटकणाऱ्या तरुणाचा Video होतोय Viral

लग्नासाठी सरकारी नोकरीवाली मुलगी पाहिजे, पठ्ठ्या हातात पोस्टर घेऊन रस्त्यावर भटकत होता अन्….; पाहा व्हायरल व्हिडीओ

‘लग्नासाठी पाहिजे सरकारी नोकरीवाली मुलगी, हातात पोस्टर घेऊन भटकणाऱ्या तरुणाचा Video होतोय Viral
लग्नासाठी रस्त्यावर भटकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter)

Government Job Marriage Viral News : लग्न करण्यासाठी एका तरुणाने भन्नाट उपाय काढला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. सरकारी नोकरी करणारी मुलगी लग्नासाठी शोधण्यासाठी हा तरुण भर रस्त्यात फिरत आहे. हातात पोस्टर घेऊन भर रस्त्यात तो उभा राहून सरकारी नोकरी करणाऱ्या मुलीचा शोध घेत आहे. लग्नासाठी सरकारी नोकरी करणारी मुलगी पाहिजे, हुंडाही मी देणार, असं या पोस्टरवर लिहिलं असून त्याचं हे खळबळजनक कृत्य कॅमेरात कैद झालं आहे. या तरुणाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.

@SushantPeter302 नावाच्या युजरने या तरुणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही दिलं आहे, एक तरुण काळा चष्मा घालून हातात पोस्टर घेऊन रस्त्यात उभा आहे. रस्त्यावरून येजा करणारी लोक त्याला पाहत आहेत. काही माणसं पोस्टर वाचल्यानंतर हसत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लग्नासाठी सरकारी नोकरी करणारी मुलगी पाहिजे. हुंडाही दिला जाईल, असं या पोस्टरमध्ये लिहिलं आहे. या तरुणाचा पोस्टर प्रचंड व्हायरल होत असून व्हिडीओ मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील असल्याचा दावा केला जात आहे.

नक्की वाचा – Viral Video : पठाण चित्रपटातील ‘तो’ सीन सुरु होताच शेकडो प्रेक्षकांनी स्क्रीनजवळ धाव घेतली अन् घडलं…

इथे पाहा व्हिडीओ

हा भन्नाट व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, समाजाची सत्य परिस्थिती अशी आहे की, “सरकारी नोकरी करणारी मुलगी बेरोजगार तरुणाशी लग्न करेल का? तुम्हाला काय वाटतंय?”. या तरुणाच्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे खळबळजनक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हिडीओंना नेटकरीही जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. कुणी चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ करून पोस्ट केला असेल, तर इंटरनेटवर नेटकरी अशा माणसांवर सडकून टीकाही करताना दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 23:09 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या