scorecardresearch

Premium

अतिशहाणपणा नडला! इतका भीषण अपघात की गाडी उडून थेट दुसऱ्याच्या अंगावर पडली, VIDEO पाहून उडेल थरकाप

Bike stunt Video viral: बाईकवर खतरनाक स्टंटबाजी करताना तरुण थेट रस्त्यावरच पडला, पाहा थरारक व्हिडीओ.

Boy Seriously Injured After Fell From Bike During Stunt
तरुणाचा जीवघेणा स्टंट

Stunt video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्याच्या काळात अनेक लोकांना सोशल मीडियावर काहीही करून फेमस व्हायचे असते. यासाठी ते काहीही करायला तयार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Video: Chilean Trapeze Artist Falls 29 Foot After Platform Collapses, Fired Later
एकीकडे टाळ्यांचा कडकडाट अन् दुसऱ्याचं क्षणी भयानक अपघात; सर्कशीतला Video पाहून येईल अंगावर काटा
Optical Illusion Puzzle You Can See Long Hair Ms Dhoni In This Tortoise Picture Viral News In Marathi
एम. एस. धोनीच्या खऱ्या फॅन्सलाच ही जादू करता येईल, ७५ टक्के डोळे मिटा आणि चमत्कार पाहा
Hungry Moneky snached Food form A Girl and eat, she trying to feed them by her hand Viral Video wins heart on Internet
भुकेल्या माकडांनी भातावर मारला ताव, तरुणीने हाताने भरवला घास; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
Amchya Pappani Ganpati Anala Song Viral Anoter Little girl
आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर ‘या’ चिमुकलीचा Video होतोय तुफान व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टंटबाजी करताना आजूबाजूला खूप गर्दी दिसत आहे. यात बरेच जण स्टंटबाजी करत आहेत. मात्र या तरुणाचा स्टंटबाजी करताना अपघात होतो. स्टंटसाठी हा व्यक्ती त्याच्या बाईकचं पुढचं चाक हवेत उंचावताच त्याचा तोल बिघडतो. व्हिडिओ पाहून आपण अंदाज लावू शकतो, की तो तरुण ज्या पद्धतीने पडला, त्यावरून त्याला गंभीर दुखापत झाली असावी. याठिकाणी त्याने स्वत:चं नुकसान तर केलंच शिवाय समोरून येणारा दुचाकीस्वारही त्याच्या गाडीच्या धडकेत खाली पडला .

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पती, पैसा अन् मर्डर…पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; कॉफीमध्ये मिसळले ‘ब्लीच’, घटनेचा VIDEO आला समोर

दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालली आहे. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी तरुण मुले, मुली, मजेशीर, विचित्र, धोकादायक, स्टंट व्हिडीओ बनवतात. याला नेटकऱ्यांचे लाखो व्ह्युज मिळतात. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boy seriously injured after fell from bike during stunt shocking video viral on social media srk

First published on: 02-10-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×