Shocking video : सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडंसंही दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चे कंपनी खेळता खेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मूल असल्यास ही बातमी आवर्जून वाचणं गरजेचं आहे. कारण- हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. यावेळी खेळता खेळता बॉल एका दुकानाच्या छतावर गेला आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा. हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल..
तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कधी कधी पालकांचाही हलगर्जीपणा कारणीभूत ठरतो. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही सेकंदांसाठी तुमच्याही काळजात धस्स होईल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, क्रिकेट खेळताना छतावर गेलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलाला विजेच्या तारांचा जोरदार शॉक बसल्याने तो गंभीररीत्या भाजला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरमान खान हा मुलगा छतावर चेंडू आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी लोखंडी पत्र्याच्या छतावरून गेलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात तो आला. अचानक शॉर्टसर्किट होऊन त्याच्या कपड्यांना आग लागली आणि तो गंभीर भाजला. यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्परता आणि धाडस दाखवत मुलाला वाचवले. त्यानंतर जखमी अवस्थेत आरमान खान याला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DWxme0eiHdZ/?igsh=aHdjMDhuMDgzajdx
एकीकडे धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ranjitmaske007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
