Viral video: लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. त्यामुळे अशा नराधमांपासून तरुणींने स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येतं आहे. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका शाळकरी मुलीनं शाळेच्या बाहेर छेड काढणाऱ्या मुलाचे असे हाल केले आहेत की बघून तुम्हीही अवाक् व्हाल..

रस्त्याने चालताना असो वा सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना इथं मुलींची छेडछाड करणाऱ्यांची कमी नाही. बलात्कार, अत्याचार, छळ याचं प्रमाण शंभर टक्के कमी झालेलं नाहीये. आजही मुलींना या सगळ्याला सामोरं जावं लागतं. काही नरधमांमुळे सगळ्यांचं नावं खराब होतं. अशाच एका तरुणाला तरुणीने चांगलीच अद्दल घडवली आहे.

कधी अश्लिल भाषा तर कधी चुकीचा स्पर्श

दिवसेंदिवस भररस्त्यात मुलींची छेड काढण्याच्या प्रसंगात वाढ होत आहेत. दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जाते. मात्र फार कमी वेळा अशा नराधमांना शिक्षा दिली जाते. बऱ्याचवेळा मुलींची छेड काढून असे आरोपी फरारही होतात. मात्र या शाळकरी मुलींनी कुणाची वाट न हिम्मतीनं छेड काढणाऱ्या तरुणाला जन्माची अद्दल घडवली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी शाळेच्या कपड्यांवर दिसत आहे, तिनं यावेळी छेड काढणाऱ्या तरुणाचे केस धरले असून त्याला चपलेने मारत आहे. रोज रोज अश्लीच भाषेत आवज देणं, कधी गाडीवर बाजूने जात स्पर्श करणं, या सगळ्या प्रकाराला वैतागून तरुणीनं अखेर त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. ती प्रचंड संतापलेली दिसत असून ती तरुणाला बेदम मारहाण करत आहे. हा सर्व प्रकार शाळेच्या बाहेरच घडला असून आजूबाजूला गर्दी जमल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नवरा गेला पळून आता काय करायचं रडून?” लहान मुलीनं शाळेत सादर केलेली कविता एकदा ऐकाच; VIDEO पाहून व्हाल लोटपोट

दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्‍चर्य वाटते. अनेक लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. नेटकरीही तरुणाच्या या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत.कोणी या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवंय, असं लिहिलंय. तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा असं म्हंटलंय.