Viral Photo: भारतात गाड्यांच्या मागील स्लोगन खूप व्हायरल होतात. वेगवेगळ्या गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून या सगळ्या गाड्या पुण्याच्याच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण कार, ट्रक, बाईकच्या मागेही अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान एका तरुणानं आपल्या बाईकच्या मागे खास मित्रांसाठी एक मेसेज लिहला आहे. हा मेसेज खास त्या मित्रांसाठी आहे जे सारखी मित्रांची गाडी मागतात. हा मेसेज वाचून या तरुणाचे मित्र त्याच्याकडे गाडी मागतना नक्की विचार करतील. हा मेसेज वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान बाईकच्या मागचा हा मेसेज वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.
आता तुम्ही म्हणाल बाईकच्या मागे असं लिहलंय तरी काय? तर पठ्ठ्याने बाईकच्या मागे, “बायकोने सांगितलंय गाडी कोणाला देऊ नको” असा मेसेज लिहला आहे. थेट बायकोनंच सांगितलंय त्यामुळे मित्र आता बाईक मागायची हिम्मतच करणार नाहीत एवढं नक्की. आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. शेवटी कसेही असले तरी मित्र हे नेहमी मित्रच असतात. तिमचेही मित्र असेच असतील तर त्यांच्यासोबतही ही बातमी शेअर करा.
पाहा फोटो
https://www.instagram.com/reel/DBgu1K5Sylt/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंगल्याबाहेर खास चोरांसाठी लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या फोटोला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.