scorecardresearch

video : बापरे! नवऱ्यासमोरच प्रियकराने नवरीला लावलं कुंकू, भर लग्नमंडपात वऱ्हाडी चक्रावले, नेटकरी म्हणाले, ” नवरीचाही यात सहभाग….”

नवऱ्यासोबत फेरे घेतल्यानंतर नवरीला सिंदूर भरण्यासाठी प्रियकर स्टेजवर चढला अन् एकच गोंधळ उडाला, पाहा व्हिडीओ.

video : बापरे! नवऱ्यासमोरच प्रियकराने नवरीला लावलं कुंकू, भर लग्नमंडपात वऱ्हाडी चक्रावले, नेटकरी म्हणाले, ” नवरीचाही यात सहभाग….”
नवऱ्यासोबत नवरीने फेरे घेतल्यानंतर प्रियकर थेट स्टेजवरच चढला. (image-Instagram)

Bride and Groom Viral Video : लग्न सराईचा सीजन असल्याने नवरा नवरीच्या भन्नाट व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका लग्न सोहळ्यातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. डीजेच्या तालावर नवरा-नवरी थिरकताना व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून अनेकदा पाहिलं असेल. पण या लग्नसोहळ्यातील व्हायरल व्हिडीओनं सर्वांनाच चक्रावून टाकलं आहे. लग्न मंडपात नवऱ्यासोबत फेरे घेतल्यानंतर स्टेजवरच नवरीला भेटायला प्रियकर आल्याने एकच खळबळ उडाली. नवरीच्या प्रियकराने असं काही भन्नाट केलं, जे पाहून नवऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला. हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

नवऱ्यासोबत नवरीने फेरे घेतल्यानंतर प्रियकर थेट स्टेजवर चढला अन्….

इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओत नवरा नवरी स्टेजवर बसलेले दिसत आहेत. त्यांना पाहून असं वाटतंय की, दोघांनी फेरे घेण्याचे आणि वरमाला घालण्याचे विधी पूर्ण केले आहेत. उपस्थित पाहुणे नवरा-नवरीला स्टेजवर शुभ आशीर्वाद देत असताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्याचदरम्यान नवरीचा प्रियकर मफलर बांधून स्टेजवर पोहोचतो आणि खिशात असलेली डबा काढून नवरीच्या डोक्यावर सिंदूर लावतो.

प्रियकराला असं करताना पाहून नवऱ्याचा संताप उडालेला असतो. पण नंतर नवरा शांत बसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. नवरीच्या डोक्यावर प्रियकराने सिंदून लावल्यावर नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी चक्रावून जातात. प्रियकराचे असे कृत्य पाहून नवऱ्याचा पार गोंधळ उडतो. प्रियकर काही वेळ स्टेजवरच उभा राहतो आणि नंतर खाली उतरताना या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – Video: भर लग्नमंडपात भरली व्यायामशाळा, नवरीला पुल-अप्स मारताना पाहून वऱ्हाडी चक्रावले, नवऱ्याने केलं असं काही…

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ gieddee नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ केव्हाचा आणि कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाहीय. काही लोकांनी हा प्रकार प्रॅंक असल्याचंही म्हटलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “नवरीचाही यामध्ये सहभाग नक्कीच असेल, त्यामुळेच तिने या घटनेला विरोध केला नाही आणि प्रियकराने तिला सिंदूर लावला.” तर दुसऱ्या एकाने म्हटलं, “प्रियकराने चक्क नवऱ्यासमोरच नवरीच्या डोक्यावर सिंदूर लावला. त्यानंतर नवऱ्याने दाखवलेले हावभाव भन्नाट आहेत.” हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 11:37 IST

संबंधित बातम्या