Find The Killer Puzzle: तुमची निरीक्षणशक्ती किती तीक्ष्ण आहे? आणि तुम्ही परिस्थितीचे विश्लेषण किती वेगाने करू शकता? याचीच परीक्षा घेणारा एक भन्नाट ब्रेन टीझर सध्या चर्चेत आला आहे. साधा दिसणारा हा चित्रकोड अनेकांना गोंधळात टाकतो; तर काही जण काही सेकंदांतच उत्तर शोधून काढतात. पण, हे इतकं सोपं नाही. कारण- उत्तर तुमच्यासमोर असलं तरी तुम्हाला ते लगेच दिसत नाही.
या चित्रात एक रेस्टॉरंट दाखवले आहे. सगळं काही नेहमीसारखं दिसत असताना अचानक एक धक्कादायक घटना घडते… रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये एका महिलेचा खून झालेला असतो. आता प्रश्न असा की, हा खून नेमका कोणी केला? आणि तो आरोपी अजूनही त्या रेस्टॉरंटमध्येच आहे.
चित्रात एकूण पाच संशयित दाखवले आहेत. प्रत्येक जण आपापल्या जागी बसलेला किंवा काम करताना दिसतो.
पहिला संशयित उजव्या बाजूला बसलेला निळ्या शर्टमधील पुरुष आहे.
दुसरी मधोमध बसलेली जांभळ्या शर्टमधील व्यक्ती.
तिसरी गुलाबी ड्रेसमधील महिला, जी कोपऱ्यात बसली आहे.
चौथा डाव्या बाजूला वॉशरूमजवळ बसलेला निळ्या शर्टमधील पुरुष.
आणि पाचवा म्हणजे वेटर, जो सर्व्हिस करताना दिसतो.

आता खरी परीक्षा इथून सुरू होते. या सर्वांपैकी कोणाचं वागणं संशयास्पद आहे? कोणाच्या हालचालींमध्ये काहीतरी वेगळं जाणवतंय? तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं, तर काही सूक्ष्म संकेत तुमच्यासमोर येऊ लागतात.
थोडं लक्ष दिल्यावर एक व्यक्ती वेगळीच दिसू लागते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवतो. तो माणूस वॉशरूमजवळ बसलेला आहे आणि त्याच्या कपड्यांकडे पाहिल्यावर आणखी काही गोष्टी लक्षात येतात. त्याच्या शर्टचा खालचा भाग फाटलेला दिसतो… आणि आश्चर्य म्हणजे त्या फाटलेल्या कपड्याचा तुकडा घटनास्थळी सापडल्याचं चित्रात सूचित होतं.
इतकंच नाही, तर त्याच्या मानेवर एक ओरखडा दिसतो. जणू काही झटापटीदरम्यान तो लागला असावा. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे त्याच्याकडे असलेली सुरी गायब आहे.
आता हे सगळे धागेदोरे एकत्र जोडले, तर चित्र स्पष्ट होऊ लागतं. उत्तर अगदी समोर असूनही अनेकांच्या नजरेतून सुटतं. पण, ज्यांची निरीक्षणशक्ती आणि विचारशक्ती तीक्ष्ण आहे, तेच हे कोडं सोडवू शकतात. तुम्हाला आरोपी सापडला का… बरं आम्ही तुम्हाला सांगतो आरोपी कोण आहे.
उत्तर:
या चित्रातील चौथा संशयित जो वॉशरूमजवळ बसलेला आहे, तोच या खुनाचा आरोपी असल्याचे संकेत स्पष्ट दाखवून देतात.

अशा प्रकारचे ब्रेन टीझर्स केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर ते तुमची निरीक्षण क्षमता, तर्कशक्ती आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता तपासण्यासाठीही उपयुक्त ठरतात. तुम्ही १५ सेकंदांत उत्तर शोधलं का?
