कोणतेही संकट आले तरी त्या क्षणाला आपले डोके थंड ठेवून, त्यावर उपाय काढणे हे प्रत्येकाला जमतेच, असे नाही. मात्र, सध्या प्रसंगावधान बाळगून आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्तर प्रदेशमधील एका १३ वर्षीय मुलीने घरात आलेल्या माकडांना पळवून लावले असल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या संदर्भात एएनआय [ANI]ने त्या १३ वर्षीय मुलीची मुलाखत घेतली असून, त्याचाच व्हिडीओ सध्या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. नेमके काय घडले ते पाहू या.

मुलाखत देणाऱ्या मुलीने घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले, “त्या दिवशी आमच्या घरी काही पाहुणे आले होते; मात्र घरात येताना ते घराचं दार लावायला विसरले. त्याच दारातून माकडं स्वयंपाकघरामध्ये घुसली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करायला सुरुवात केली. तेवढ्यात घरातली एक लहान मुलगी स्वयंपाकघरात गेली आणि सर्व दृश्य पाहून रडून तिथून पळायला लागली.”

lephant fights for life as crocodile bites its trunk in deadly attack viral Video
तळ्याकाठी पाणी पीत होता हत्ती, पाण्यात लपलेल्या मगरीने अचानक केला हल्ला, जबड्यात पकडली सोंड अन्…थरारक Viral Video
Delhi Bus Passenger Thrashed By Group Of Pickpockets They tried pulling off his jacket and dropped him on the floor
पाकिटमारांची दादागिरी, बसमधील प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, VIDEO पाहून व्हाल थक्क
Fact Check: Uddhav Thackeray & Eknath Shinde United To Join BJP As Whole Shivsena Vanchit Bahujan Aghadi
उद्धव ठाकरे व शिंदे एकत्र; संपूर्ण शिवसेना भाजपाशी युती करणार? वंचित बहुजन आघाडीचा दाव्याशी जवळून संबंध, नेमकं ठरलं काय?
This snake has four legs
अरे बापरे! या सापाला आहेत चक्क चार पाय; Viral Video पाहून युजर्स म्हणाले…, “ही तर सापाची मावशी”
funny bike accident after the bike collision the bike rider
काका चुकीच्या दिशेने आले; धडक दिली अन् वर म्हणतात “अरे मी तर…” ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
YouTuber Tanna Dhaval transformed new Honda Civic into Lamborghini Terzo Millennio Watch unbelievable transformation
VIDEO: भारतीय तरुणाची कमाल! होंडा कारचे केलं आलिशान लॅम्बोर्गिनीमध्ये रूपांतर; खर्च ऐकून व्हाल थक्क
Badal Barsa Biljuli Cute expressions of a boy on a famous song
‘बादल बरसा बिजुली’, प्रसिद्ध गाण्यावर चिमुकल्याचे क्यूट एक्सप्रेशन्स; ४० लाखाहून अधिक लोकांनी पाहिला VIDEO
kiley paul sang the gulabi saree song at the airport
किली पॉल ‘गुलाबी साडी’ गाणं म्हणतो तेव्हा; मराठी ऐकून थक्क झाले नेटकरी, म्हणाले, “अरे भावा…”
EVM Caught in Van Viral Video
मोदींनी उमेदवारी अर्ज भरताच वाराणसीत गाड्यांमध्ये पकडले गेले EVM? भाजपावर होतेय टीका पण Video मध्ये लपलंय काय हे पाहा

हेही वाचा : विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

“त्या मुलीचा आवाज ऐकून आम्ही स्वयंपाकघरात पाहिलं, तर ती माकडं सर्व अन्न इकडे-तिकडे फेकत होती आणि खूप गोंधळ घालत होती. ते दृश्य पाहून आम्ही सगळेही घाबरलो होतो. मात्र, तेवढ्यात माझी नजर अलेक्सावर पडली. तेव्हा मी अलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्याचा आदेश दिला. त्याबरोबर त्या यंत्रानं कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढून दाखवला. तो आवाज ऐकतच एकेक करून सर्व माकडं घाबरून पळून गेली.” हे सांगताना त्या मुलीने पुन्हा एकदा अलेक्साला तोच आदेश दिला आणि यंत्राने भुंकण्याचा आवाज काढून दाखवला.

या मुलाखतीचा व्हिडीओ एएनआयच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर झाला असून, इन्स्टाग्रामवरदेखील चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.

“नशीब तेव्हा तरी अलेक्साने ‘सॉरी मला समजले नाही’, असे उत्तर दिले नाही”, असे एकाने मिश्कीलपणे लिहिले आहे.
“खरंच माणसाकडे बुद्धी हेच सर्वांत उत्तम शस्त्र आहे”, असे दुसऱ्याने लिहिले.
“ग्रेट! त्या मुलीचे खूप कौतुक आहे. अशा वेळेस एवढे प्रसंगावधान… खूप मस्त”, असे तिसऱ्याने लिहिले.
“वाह खूपच मस्त”, असे चौथ्याने लिहिले आहे.

हेही वाचा : बापरे, तब्बल १८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची झाली चोरी! किंमत बघून व्हाल अवाक! जाणून घ्या नेमके प्रकरण

व्हायरल व्हिडीओ पाहा :

इन्स्टाग्रामवरील naughtyworld नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत या पोस्टवर ४७.२K लाइक्स आणि ३०८ कमेंट्स आलेल्या आहेत.