scorecardresearch

Premium

अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ज्योतिषाला हात दाखवला आणि घात झाला, भेट दिलेली वस्तू खाल्यामुळे महिलेने गमावला जीव?

अनेक लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. ज्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते.

woman died consuming chocolate
ज्योतिषाला हात दाखवला आणि घात झाला. (Photo : Freepik, Social Media)

जगभरातील अनेक लोक ज्योतिषशास्त्र, टॅरो कार्ड आणि हस्तरेखाशास्त्रावर विश्वास ठेवतात तर अनेकजण अशा गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. कारण आजकाल अनेक लोक भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असल्याच्या बातम्यादेखील व्हायरल होत असतात. असं असतानाही अनेक लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. याचाच गैरफायदा घेत काही लोक भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांना त्यांच्या वाईट भविष्याबद्दल सावध करतात आणि नंतर ते सुधारण्याच्या किंवा बदलण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे लुटतात. अशी अनेक प्रकरणे याआधीही घडली आहेत. अशातच आता आणखी एक असेच धक्कादायक प्रकरण उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका महिलेला ज्योतिषाला हात दाखवल्यामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.

महिला ज्योतिषी रस्त्यावर भेटली अन् घात झाला…

fear forgetting relationships nuclear family structure
आत्या, मामा, काका, ही नाती गायब होतील का?
Balance food and diet helps maintain digestive system
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: पोट साफ होत नाही?
Personality Traits
Personality Traits : अतिशय बुद्धिमान असतात ‘या’ राशीचे लोक; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते….
Rupali barua on marrying ashish vidyarthi
“मी त्या लोकांना…”, आशिष विद्यार्थींशी लग्नानंतर ट्रोल करणाऱ्यांना दुसऱ्या पत्नीचं सडेतोड उत्तर; त्यांच्या मुलाबाबतही केलं भाष्य

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ब्राझीलमधील महिलेबरोबर घडली आहे. फर्नांडा वालोज पिंटो या महिलेच्या बहीणीने सांगितलं की, पिंटो या ऑगस्ट महिन्यामध्ये मॅसेओ येथे गेली होती. यावेळी ती रस्त्यावरुन फिरत असताना हस्तरेषा पाहून भविष्य सांगणाऱ्या एका वयस्कर महिलेने तिला थांबवले. या महिलेने पिंटोला सांगितलं, “तुझा मृत्यू जवळ आला असून तु काही दिवसच जिवंत राहणार आहेस.” यानंतर त्या महिलेने तिला भेट म्हणून एक चॉकलेट दिले, जे पिंटोने खाल्ले आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा- चक्क डोक्यावर गॅस सिलेंडर ठेवून महिलेने केला जबरदस्त डान्स…, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

पिंटोच्या बहीणीच्या म्हणण्यानुसार, पिंटोने चॉकलेट खाल्ल्यानंतर कुटुंबाला अनेक मेसेज पाठवले होते. मेसेजमध्ये तिने लिहिलं होत की, एका वृद्ध महिलेने दिलेलं चॉकलेट खाल्ल्यामुळे तिला सतत उलट्या होत आहेत. तर पिंटोने पाठवलेल्या या मेसेजमुळे तिच्या कुटुंबाला या प्रकरणाची माहिती समजली. पिंटोने मेसेजमध्ये पुढं लिहिलं होतं, “मला खूप भूक लागली होती म्हणून मी ते चॉकलेट खाल्ले पण ते चॉकलेट खूप कडू आहे आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढले असून माझ्या सतत उलट्या होत असून मला खूप विचित्र वाटतंय.”

धक्कादायक माहिती आली समोर –

दरम्यान, पिंटोच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिला विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. शिवाय तिने खाल्लेल्या चॉकलेटमुळेच तिला विषबाधा झाली का याचा तपास आता सुरू आहे. तसेच तिच्या हत्येसाठी ज्योतिषाला कोणी पैसे दिले होते का, याचाही शोध सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Brazil a woman lost her life due to superstition and showed her hands to an astrologer jap

First published on: 04-10-2023 at 13:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×