मानव आणि प्राणी यांच्यातील प्रेम आणि आपुलकीचे नाते खूप जुने आहे. संरक्षण आणि सोबत म्हणून युगानुयुगे काही पाळीव प्राण्यांना मानवाने आपल्या वस्तीत स्थान दिले. पाळीव प्राण्यांपासून मिळणारे प्रेम, जिव्हाळा आणि सहवास महत्त्वाचा ठरू लागला आहे. या प्राण्यांना बोलता येत नसले तरी केवळ नजरेने आणि स्पर्शाने कुटुंबातील सदस्यांची भाषा आणि भावना त्यांना समजते. परिचय आणि सहवासाने माणसांनाही प्राण्यांची भाषा समजते. यामुळेच सोशल मीडियावर वेळोवेळी असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये प्राणी आणि मानव यांच्यातील प्रेम स्पष्टपणे पाहायला मिळते. तामिळनाडूतील पेरंबलूर येथून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार चालक असलेले एम. प्रभू यांना झाडाजवळ एक माकड बेशुद्धावस्थेत पडल्याचं दिसलं. भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्याच्या मदतीसाठी प्रभू पुढे सरसावले आणि त्यांनी माकडाला जवळ घेतले आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी केली. मात्र दुचाकीवरून जात असताना त्यांना लक्षात आलं की माकडाच्या हृदयाचे ठोके कमी होत आहेत. माकड अत्यवस्थ दिसल्याने त्यांनी लगेचल गाडी थांबवली आणि त्याव प्रथमोपचार करण्याचा निर्णय घेतला. माकडाच्या छातीवर जोर देऊन त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र माकड प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आलं. शेवटी त्यांनी स्वत:च्या तोंडातून त्याच्या तोंडात हवा फुंकत श्वास देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न दोनदा तिनदा केल्यानंतर माकडाने प्रतिसाद दिला आणि शुद्धीवर आलं. हा संपूर्ण प्रकार बाईक असलेल्या त्यांच्या मित्राने मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेटपटू आर अश्विननेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्टला ‘देअर इज होप’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ मूळतः भारतीय वन सेवेतील अधिकारी सुधा रमन यांनी शेअर केला होता.

माकडाचा जीव वाचवल्यानंतर नेटिझन्सनी त्यांच्या कौतुकाचा वर्षाव केला आहे. माकडाचा जीव वाचवणारे साक्षात प्रभूंचं रूप असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. ज्यांनी देव पाहिला नसेल, त्यांनी प्रभूंकडे पाहावं, असं एका युजर्सने लिहीलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breathing through the mouth saved the monkey life viral video rmt
First published on: 14-12-2021 at 08:32 IST