पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्स

या व्हिडिओतील वधू आणि तिच्या भावाचा डान्स परफॉर्मन्स चांगलाच भाव खाऊन गेला.

Bride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
Bride and brother pull of epic wedding dance routine video goes viral

लग्न हा अनेकांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. पती-पत्नी यांच्याप्रमाणे संपूर्ण कुटुंबियांसाठीच लग्नसोहळ्याच्या आठवणी खास अशाच असतात. लग्नानंतर अनेक वर्षांनीही या आठवणी अनेकांच्या मनात तरळत राहतात. काळ बदलत गेला तसा या लग्नसोहळे साजरे होण्याचा पद्धतींमध्ये अनेक बदल घडत गेले. हल्लीच्या लग्नसोहळ्यांमध्ये संगीत सोहळा ही अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. लग्नाप्रमाणेच लाखो रूपये खर्चून या सोहळ्यांची तयारी केली जाते. या संगीत सोहळ्यांसाठी वधु-वर, त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी असे सर्वचजण खूप उत्सुक असतात. त्यामुळे हल्ली बॉलीवूड इंडस्ट्रीपासून ते सामान्यांपर्यंत सगळीकडेच लग्नापेक्षा संगीत सोहळ्यांची जास्त चर्चा रंगताना दिसते. सध्या सोशल मिडीयावर अशाच एका संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये वधू आणि तिच्या भावाने बॉलीवूडच्या गाण्यांवर धम्माल असा डान्स परफॉर्मन्स सादर केला. या मॅरेथॉन परफॉर्मन्समध्ये दोघांनीही बॉलीवूडच्या अनेक लोकप्रिय गाण्यांवर केलेले सादरीकरण उपस्थितांची चांगलीच वाहवा मिळवून गेले. संगीत सोहळ्यात वधु आणि वराचा डान्स परफॉर्मन्स शक्यतो आकर्षणाचा विषय असतो. मात्र, या व्हिडिओतील वधू आणि तिच्या भावाचा डान्स परफॉर्मन्स चांगलाच भाव खाऊन गेला. पाहुयात या हटके परफॉर्मन्सची झलक.
मिळवून गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bride and brother pull of epic wedding dance routine video goes viral

ताज्या बातम्या