Bride groom fighting video: लग्न हा मुलगा आणि मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी त्याला खास बनवण्यासाठी बरीच तयारी केली जाते. कधी कधी लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. अनेक लग्नात अशा घटना घडतात, ज्या फारच मजेदार असतात आणि त्या घटना आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहतात.

सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला असून आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ येऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडीओमुळे सध्या खळबळ उडाली आहे. अनेक लग्नांमंध्ये मानपानावरून नातेवाईकांचे रुसवे फुगवे सुमोर येतात, तर काही लग्नांमध्ये हे वाद मारहाणीपर्यंतही पोहोचतात. पण, लग्नात नवरा-नवरीमध्येच भांडण झालेलं फारच क्वचित पाहायला मिळेल. असाच वधू-वराचा भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या वधू-वरामध्ये किरकोळ कारणावरून भांडण होते आणि ते एकमेकांना कानाखाली मारू लागतात, ज्यामुळे या लग्नातील व्हिडीओ ट्रेंड होऊ लागला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

(हे ही वाचा : बापरे! भररस्त्यात धावत्या बाईकनं अचानक घेतला पेट, दुचाकीस्वार उतरत होता अन् थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर)

नेमकं काय घडलं?

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वधू-वर स्टेजवर उभे आहेत आणि त्यांच्यासोबत इतर काही लोकही उभे आहेत. या दोघांच्या गळ्यात वरमालाही दिसतात. अचानक वधूला काय होत आहे हे कळत नाही आणि ती वराला चापट मारते. यानंतर वरालाही राग येतो आणि तो वधूला मारतो. यानंतर दोघेही स्टेजवर सर्वांसमोर भांडू लागतात. तिथे उभे असलेले लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते दोघेही मान्य करत नाहीत आणि एकमेकांशी भांडत राहतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लग्नसमारंभात ही मारामारीची घटना कशी सुरू झाली, हेदेखील कळू शकले नाही. व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट होताच नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मजेशीर कमेंट्स टाकल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://x.com/PalsSkit/status/1790976945347571756?ref_src

हा व्हिडीओ X प्लॅटफॉर्मवर @PalsSkit नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत दोन लाख ९० हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले, “रील बनवणारा असावा.” दुसऱ्या युजरने लिहिले, “अरे देवा, मी पहिल्यांदाच अशी भांडणे पाहिली आहेत, तीही पार्टनर्समध्ये.” तिसऱ्या युजरने लिहिले, “हे खरे प्रेम आहे.” तर एका युजरने लिहिले, “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी हसू थांबवू शकत नाही.” याशिवाय, आणखी बरेच जण इमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.