Viral video: सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नवरी आणि नवरदेवासोबतच घरातील इतर सदस्यदेखील आपल्या लूकनं आणि डान्समुळे पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाचे मित्र-मैत्रिणी नेहमी मस्ती करतात. या मजा-मस्तीमुळे लग्नात एक वेगळीच रंगत येते. पण एका तरूणाला मित्रांची ही मजा-मस्ती चांगलीच महागात पडली आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल. ही नवरीबाई अतिशय रागात आहे आणि वरमाळा घालतानाही ती आपल्या चेहऱ्यावरील हावभाव लपवू शकलेली नाही.

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा या मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी लग्नामध्ये नवरीनं नवरदेवाच्या गळ्यात वर मला घालताना नवरदेवाच्या मित्राची चांगलीच धुलाई केलीय.

कोणत्याही लग्नात सर्वात जास्त मजा नवरी-नवरदेवाचे मित्र घेतात. रिवाजांदरम्यान ज्याप्रकारणे मित्र वागतात ते बघून नवरी-नवरदेवही हैराण होतात. अनेकदा हे बघून हसूही येतं. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, , नवरा नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यासाठी स्टेजवर उभे आहेत. यावेळी नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालणार तेवढ्यात नवरदेवाच्या मित्रानी नवरदेवाला मागे खेचलं. एकदाच नाहीतर नवरी हार घालताना नवरदेवाचा मित्र वारंवार हेच करत होता. यावेळी नवरी भडकते आणि थेट नवरदेवाच्या मित्राची धुलाई करते. यावेळी नवरदेवही नवरीच्या बाजूनेच असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरुन दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा नवरी-नवरदेवाचा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा बघत आहे. शेअर करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यावर देत आहेत.