scorecardresearch

सासरी जाण्याआधी आजीला भेटायला आली नवरी आणि…, Viral Video पाहून व्हाल भावूक

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

bride, trending news,
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आता Wedding Season सुरु झाला आहे. सोशल मीडियावर अनेक वधू-वरांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यात नुकताच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैवाहिक जीवनातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे नवरीच्या निरोपाचा. लग्नात सगळं सुखात पार पडलं की निरोपाच्या वेळी संपूर्ण घराचं वातावरण बदलून जातं. लग्नानंतर मुलगी कायमची घरच्यांना सोडून जाते. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी भावनिक होणे स्वाभाविक आहे. दरम्यान, एका वधूचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विदाईपूर्वीचा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

नवरीने रडणाऱ्या आजीला असे गप्प केले

लग्नादरम्यानचा हा सुंदर क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एक नववधू तिच्या सासरच्या घरी जाण्यापूर्वी तिच्या आजीला भेटायला येते, परंतु यावेळी काय होते ते पाहून तुम्ही भावूक व्हाल. नातीला पाहून आजी रडायला लागते, दुसरीकडे नवरी रडण्याऐवजी आजीला शांत करू लागते. ती दूर जात नाही आहे, असे सांगत नवरी तिच्या आजीला सांत्वन देते. माझे सासरचे घर १० किमी अंतरावर आहे. तू म्हणशील तेव्हा मी येईन.

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

आणखी वाचा : RRR च्या यशानंतर Jr NTR ने घेतली हनुमान दीक्षा घेतली, राम चरण प्रमाणे करणार कठोर महाव्रत

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, “माझ्याकडेसुद्धा अशी प्रेमळ आजी असती तर…” दुसरा नेटकरी म्हणाला, “मला माझ्या आजीची आठवण आली.” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bride came to meet her grandmother before going to sasural watch this viral video dcp

ताज्या बातम्या