Viral video: भारतात लग्नाच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात लग्नाचे बार उडत आहेत. यातच विवाह समारंभामध्ये वधू-वराला जेवढा मान असतो, तेवढीच मानाची असते ती करवली. नवरदेवाची आणि नवरीच्या बहिणीला करवलीचा खास मान असतो. सोशल मीडियावर नेहमीच लग्न, त्यातील गमतीजमती आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून अनेक जण आपणही आपल्या लग्नात असंच काही भन्नाट करायचं असं काही जण ठरवतात. सध्याच्या काळात सगळीकडेच जोरदार हळदीचा धिंगाणा असतो. अशात एका हळदी कार्यक्रमातील करवलीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. अया करवलीने नाचून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवलं आहे.

आजकाल सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एका नुकत्याच लग्न झालेल्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं भन्नाट डान्स केला आहे. मराठी गाण्यावर ठेका धरत नवरी आणि करवलीनं कार्यक्रम गाजवला आहे. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात.

“गलगले सावळा गौरी चंद्रकळा गौरीला लागला गलगलेचा लळा वेडावली सोकावली गोरी गौरी गोरी गलगलेच्या महाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवाखाली” या मराठी गाण्यावर या दोघींनी भन्नाट डान्स केलाय. यावेळी दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. दोघी इतक्या सुंदर नाचतायेत, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. तिचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त हौस करता आली पाहिजे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघी गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी वरातीत आलेल्या साऱ्यांनीच गर्दी केलीय. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय. लग्न सोहळ्यात सर्वच व्यक्ती नाचून आनंदाने प्रत्येक क्षण एंजॉय करतात. पिवळी साडी नेसून तरुणीने केलेल्या या डान्सवर अनेक कमेंट्स आल्यात.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ _sanjana.26_20 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.