Bride dance video: आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात.सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ‘हम आपके हैं कौन’ नावाचा सिनेमा आला आणि लग्नाची पद्धतच बदलून गेली. लग्न ‘इव्हेंट’ व्हायला लागलं. संगीत किंवा नवरदेवाचे बूट लपवण्यासारख्या गोष्टी आपल्याकडच्या लग्नात सुरू झाल्या. लग्नसोहळा ही गोष्ट गेल्या काही वर्षांत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाताना दिसते आहे. डान्स पासून वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत हल्ली लग्नामध्ये नियोजन केलं जातं. अशातच आता नवरा-नवरीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. वैवाहिक आयुष्याची सुरूवात करताना लग्नाच्या दिवशी अनेक नवरा-नवरी कपल्स डान्स करताना दिसतात.अशाच एका नवरीचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. एका लग्नात नवरीला नाचण्याचा मोह आवरला नाही. यावेळी नवरीने तिच्या भावंडांसोबत खानदेशी गाण्यावर तुफान डान्स केला आहे.
प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकलामध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा एक प्रदेश आहे. येथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी संभळीवर नवरी लग्नात थिरकली आहे. पारंपारीक पद्धतीने वाजणाऱ्या संभळच्या तालावर नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. यावेळी नवरीसोबत इतरांनीही ठेका धरत डान्स केला आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर rishvika_official या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत
