Wedding bride dance video: आजकाल लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही मजेदार तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. आता कधी नवरीचा डान्स तर कधी नवरदेवाचा डान्स तूफान व्हायरल होतो. असाच एक व्हडिओ सध्या व्हायरल झाला आहे. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तिचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत. लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. आता नवरा नवरीचा हात पकडत किंवा नवरी लाजत मान खाली घालून चालत प्रवेश करत नाहीत. अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज असो… लग्नात नवरा-नवरीची एन्ट्री हा विषय पाहण्यासारखा झालाय. अशातच नवरीने तिच्या मैत्रीणींसोबत लग्नात डान्स करत जबरदस्त अशी एन्ट्री घेतली आहे. खास नवरदेवासाठी या नवरीनं केलेला डान्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होता.हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ

नवरीचा हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर झाला असून तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत तुफान हीट झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडियोला लाखो लाईक्स मिळाले असून नेटकरी पुन्हा पुन्हा हा सुंदर डान्स बघत आहेत.