Viral Video : नवरीच्या मेकअप रुममधील व्हिडीओ व्हायरल, चॉकलेट हेअरस्टाईलची नेटकऱ्यांना पडली भुरळ | bride decorated her hairstyle with KitKat 5Star Ferrero Rocher and Milky Bar bride chocolate hairstyle makeup room video clip viral nss 91 | Loksatta

Viral Video : नवरीच्या मेकअप रुममधील व्हिडीओ व्हायरल, चॉकलेट हेअरस्टाईलची नेटकऱ्यांना पडली भुरळ

केसांच्या अनेक प्रकारच्या स्टाईल तुम्ही पाहिल्या असतील, पण या नवरीच्या चॉकलेट हेअरस्टाईलची गोष्टच वेगळी आहे, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Bride Makeup Room Viral Video On Instagram
नवरीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय. (Image-Instagram)

Bride Chocolate Hairstyle Viral Video : प्रत्येकालाच स्वत:च्या लग्नात खूप सुंदर दिसावं, असं वाटत असतं. नवरा असो वा नवरी सौंदर्यासाठी भन्नाट मेकअप करायला नेहमीच तयार असतात. वऱ्हांड्यांनाही आपल्या सौंदर्यातून थक्क करणारे वर-वधू मेकअपचने नवनवीन प्रयोग करताना दिसतात. असाच काहीसा प्रकार एका नवरीने तिच्या लग्नात केल्याचा एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. नवरीने सुंदर हेअरस्टाईल करण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला ५ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत.

नवरी तिच्या केसांना सुंदर स्वरुप देताना या व्हिडीओत दिसत आहे. नवरीने तिची हेअरस्टाईल किटकॅट, फाईव्ह स्टार, फेरेरो रोशर आणि मिल्की बारच्या चॉकलेट्सनी सजवली आहेत. नवरीने फुलांची माळ लावून केसांना सजवल्याचं तुम्ही याआधी पाहिलं असेल. पण या नवरीने केलेली हेअरस्टाईल खूपच वेगळी आहे. जबरदस्त हेअरस्टाईलसोबत नवरीने सुंदर दागदागिनेही घातले असून यमाध्ये झुमके, डोक्याची पट्टी आणि चॉकलेटने सजवलेला हार इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Viral : ‘पठाण झाला फ्लॉप’; ‘त्या’ चित्रपटगृहातील व्हायरल व्हिडीओमुळं सिनेविश्वात खळबळ

इथे पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, “माफ करा, मला नाही वाटत ही हेअरस्टाईल खूप आकर्षक आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “बालपणात आम्ही अशा गोष्टींच्या गप्पा मारायचो. त्यावेळी आम्ही पत्त्यांचे फूल बनवले पण असं केलं नाही.” नवरीच्या हेअरस्टाईलचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण चॉकलेट खाण्याचा पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पण नवरीच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली तिने चॉकलेटचा वापर डोक्यावरची केसं सजवण्यासाठी केला, हे पाहून सोशल मीडियावर काही जण चक्रवून गेले आहेत. नवरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशाप्रकारची हेअरस्टाईल तुम्ही यापूर्वी क्वचितच कधी पाहिली असेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 13:11 IST
Next Story
Video: “मला तर मोक्कार धिंगाणा…”, चिमुरड्यानं सांगितला लोकशाहीचा भन्नाट अर्थ; म्हणाला, “माझे बाबा लोकशाही मानतात म्हणून…”