नवरी-नवरीच्या मनात लग्नाबाबत जितका उत्साह, आनंद असतो, तितकीच भीती आणि धाकधूकसुद्धा असते. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज लग्नामध्ये जोडीदाराला समोर पाहतात हृदयाची धडधड वाढते, शरीर गार पडतं किंवा काही जण तर अगदी थरथरूही लागतात. आपल्या भावी जोडीराला समोर पाहताच काही जण इतके इमोशनल होतात की ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रणच ठेवू शकत नाही. अशाच एका नवरदेवाच्या बाबतीच झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. लग्नाच्या दिवशी नवरा-नवरी कधी कधी इतके उत्साही होतात की त्यांना आपल्या भावनांवर आवर घातला येणं कठीण होऊन जातं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आणि त्याचे मित्र हे स्टेजवर नवरीची वाट पाहत असतात. जसंच नवरी लग्न मंडपात एन्ट्री करते, त्याच क्षणी आपल्या होणाऱ्या पत्नीला पाहून स्टेजवर नवरदेवाला भुरळ येत आणि धाडकन स्टेजवर कोसळतो.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
Dubai sky transforms to green viral video
बापरे! हिरव्या रंगाचे ढग आले दाटून! पाहा, दुबईतील वादळाचा धडकी भरवणारा Video…
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

खरं तर नवरीला पाहिल्यानंतर नवरदेवाला आनंद होतो आणि मग तो स्टेजवर बेभान होऊन वागू लागतो. नवरीला पाहून त्याला चक्कर आल्याचा केवळ तो अभिनय करत अशतो. चक्कर आल्याचं नाटक करत हा नवरदेव पुन्हा उभा राहतो आणि आपल्या होणाऱ्या पत्नीला आनंदाच्या भरात स्टेजवर बोलावतो. नवरीचं स्टेजवर स्वागत करताना नवरदेवाच्या चेहऱ्यावर आपोआप गोड हास्य फुलताना दिसून येतंय.

हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही, मात्र हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या मनात बसला असून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय.

आणखी वाचा : Viral Video : जीव वाचवण्याचा थरार व्हिडीओत कैद, पोटच्या लेकराला दुसऱ्या मजल्यावरून फेकलं…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर wedabout नावाच्या अकाऊंटवरून अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करता तेव्हा असंच काहीसं घडतं. तुमच्या पार्टनरला टॅग करा ज्याला तुम्हाला हे करताना बघायचं आहे.” इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.