scorecardresearch

३०० लोकांसमोर स्टेजवर किस केल्यानं संतापली नवरी, पोलिसांना बोलावून भर मंडपातच नवऱ्याला…

Viral Trending News: २३ वर्षीय नवरीने पोलिसांना सांगितले की या माणसाने त्याच्या मित्रांसह पैज लावली होती म्हणून त्याने भरमंडपात तिला किस केलं, तिला त्याच्या चारित्र्यावर…

३०० लोकांसमोर स्टेजवर किस केल्यानं संतापली नवरी, पोलिसांना बोलावून भर मंडपातच नवऱ्याला…
३०० लोकांसमोर स्टेजवर किस केल्यानं संतापली नवरी, पोलिसांना बोलावून भर मंडपातच नवऱ्याला… (फोटो: प्रातिनिधिक/Pixabay)

Viral Trending News: काही दिवसांपूर्वी एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. लग्नमंडपात गळ्यात घालताना नवरीने नवऱ्याला किस केल्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. लग्नात नवरीला किस करण्याची पद्धत परदेशात फारच प्रसिद्ध आणि तितकीच कॉमन आहे, अलीकडे बहुतांश तरुणाई परदेशी वेबसिरीज, चित्रपटात रस घेत असल्याने असे प्रकार भारतातही सर्रास होतात, अर्थात मियाँ बीवी राझी तो क्या करेगा… हा नियम तिथेही लागू होतोच. पण समजा नवरा नवरीपैकी कुणाचीही असं मंडपात किस करण्याला तयारी नसेल आणि तरी त्यांच्या जोडीदाराने जबरदस्ती किस केलं तर…? तर काय होऊ शकतं हे आता आपल्याला बरेलीमध्ये घडलेल्या एका प्रसंगातून स्पष्ट समजत आहे.

अलीकडेच उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका नवरीने आपल्या नवऱ्याने ३०० लोकांच्या समोर किस केलं म्हणून लग्न मोडल्याचे समजत आहे. वरमाला घालण्याच्या विधिदरम्यान हे नवरदेव थोडे उत्साहात आले आणि त्यांनी आपल्या बायकोला किस करण्याचा प्रयत्न केला पण हे बघून नवरी इतकी भडकली की ती थेट मंडपातून निघूनच गेली. इतकंच नव्हे तर तिने लगेच तिथे पोलिसांना बोलावून घेतले. २३ वर्षीय नवरीने पोलिसांना सांगितले की या माणसाने त्याच्या मित्रांसह पैज लावली होती म्हणून त्याने भरमंडपात तिला किस केलं, तिला त्याच्या चारित्र्यावर अगोदरच शंका होती असेही तिने पोलिसांना सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार नवरीने नवऱ्याविरुद्ध तक्रार करत असे सांगितले की, विधी सुरु असताना तो मला सतत स्पर्श करत होता, मला हे सुद्धा आवडले नव्हते आणि मग तर त्याने थेट किस केलं, त्याने माझा अपमान केला आहे त्याला माझ्या स्वाभिमानाची अजिबात पर्वा नाही आणि पाहुण्यांसमोर हे असं वागत असेल तर भविष्यात तो काहीही करू शकतो त्यामुळे मला लग्न करायचे नाही. यानंतर नवरीच्या आईने, कुटुंबाने व अगदी पोलिसांनीही मध्यस्थी करून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने लग्न करण्यास थेट नकार दिला आहे.

हे ही वाचा<< Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार २६ वर्षीय नवरदेवाचे नाव विवेक अग्निहोत्री असे आहे. बहजोई पोलीस अधिकारी पंकज लावनिया यांनी TOI ला सांगितले की, “तांत्रिकदृष्ट्या जोडप्याचे लग्न झाले आहे कारण घटना घडली तेव्हा विधी पूर्ण झाले होते. पण नवरीने आता नवऱ्यासह जाण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी सध्या या जोडप्याला काही दिवस ब्रेक घेण्यास सांगितलेले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:14 IST

संबंधित बातम्या