सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे आणि या सिझनमध्ये सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, तर काही भावनिकही असतात. कधी कधी तर वधू वराचे भांडणाचेही व्हिडिओ व्हायरल होतात. आता असाच एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. वराने वधूला जबरदस्तीने मिठाई खाऊ घातल्यावर हे भांडण सुरू झाले. त्यानंतर पुढे काय झाले, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. व्हिडिओ इतका मजेदार आहे की लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर स्टेजवर वधूला मिठाई भरवत आहे. कदाचित वधूला ती मिठाई खायची नसते, तरीही वर तिला जबरदस्तीने भरवताना दिसत आहे. दरम्यान, वधूला राग येतो आणि नंतर ती वराला जोरदार चापट मारते. त्यांनंतर वराला देखील राग येतो आणि तोही वधूला मारतो. दोघेही एकमेकांवर थप्पडांचा वर्षाव करतात. अशाप्रकारे हे भांडण सुरु होऊन स्टेजवरच मोठी मारामारी होते. मग त्यांचे भांडण थांबवण्यासाठी पाहुणेही स्टेजवर येतात, मात्र वधू-वरांना थांबवण्याच्या नादात उलट पाहुण्यांनाही मारहाण होते.
( हे ही वाचा: Video: सिंहिणीसोबत घरात मस्ती करत होता ‘हा’ लहान मुलगा; अचानक तिने हात जबड्यात पकडला अन् तितक्यात)
येथे पाहा हाणामारीचा व्हिडिओ
( हे ही वाचा: Video: आगीबरोबर स्टंट करायच्या नादात नको त्या ठिकाणी लागली आग; ‘तो’ पायजमा काढून पळत सुटला अन..)
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तुम्हीही याआधी वधू-वरांमध्ये अशी भांडणे क्वचितच पाहिली असतील. @gharkekalesh नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे ६० हजार वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिले – हे लग्न होत आहे की घटस्फोट? दुसऱ्याने लिहिले आहे की, त्यांनी यानंतर लग्न केले की नाही?