Groom and bride dance in haladi video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका नवरा नवरीने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आणि या आनंदात त्यांनी त्यांची हळद चांगलीच गाजवली. यावेळी नवरा नवरीने केलेल्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे.
आपल्याच मामाच्या मुलीशी लग्न केल्याचा आनंद नवरदेवाच्या चेहऱ्यावर यावेळी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.लग्नात काही क्षण मजेशीर तर काही भावुक असतात. कधी नवरा-नवरी आनंदाने हसताना दिसतात तर कधी त्यांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रूही येतात. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.
अशी ही बनवाबनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली आहे तरी ही हा चित्रपट आज देखील लोकप्रिय आहे. आज देखील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षक मनापासून घेत असतात.या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली असून या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच एका नवरा नवरीनं आपल्या हळदीच्या कार्यक्रमात याच गाण्याचावर जबरदस्त असा डान्स केला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_weddingz नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “उशीर झाला तरी चालेल पण मामाचीच करणार” असं लिहलं आहे.