दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची चर्चा संपूर्ण जागात आहे. या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सवर मीम्स व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींपासून क्रिकेटर्स चित्रपटातील गाणी आणि संवादावर व्हिडीओ आणि रिल्स तयार करत आहेत. लग्नातही या चित्रपटातील गाण्यांची धूम पाहायला मिळत आहे. अशाच एका लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत वधू आणि वर पुष्पा चित्रपटातील गाण्यावर ठेका धरतान दिसत आहेत. ‘ओ अंतवा’ या गाण्यावर वधूवराने जबरदस्त डान्स केला. मराठमोळा लग्नाचा पेहराव असलेल्या वधूने आपल्या डान्स स्टेप्सने सर्वांना नाचण्यास भाग पाडलं.
हा व्हिडीओ Chemistrystudios नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत वधूवरांसोबत त्यांची मित्रमंडळी आणि नातेवाईक ठेका धरताना दिसत आहेत. शेवटी नवरा तिला म्हणतो बसं झालं आता चला, असं करत आत घेऊन जातो. प्राची मोरे आणि रोनक शिंदे अशी वधूवरांची नावं असल्याचं समोर आलं आहे.




आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. वधूवराच्या डान्सला सोशल मीडियावर चांगली दाद मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.