scorecardresearch

VIRAL VIDEO : नवरीला घेण्यासाठी नवरदेव स्टेजवरून खाली आला, पुढे जे होतं ते पाहून तुम्ही म्हणाल, ‘किती क्यूट!’

लग्नाच्या कार्यक्रमात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या पाहूनच सगळे हैराण होतात. कल्पना करा की, जर ऐन लग्नात नवरीनेच माघार घेतली तर? तर नवरदेवाची काय फजिती होईल, हा व्हिडीओ एकदा पाहाच.

Groom-Video-Viral
(Photo: Instagram/ weddingzworld)

लग्नाच्या कार्यक्रमात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या पाहूनच सगळे हैराण होतात. नवरी आणि नवरदेवाला आपली एन्ट्री अतिशय दिमाखात आणि अनोख्या पद्धतीने व्हावी असं वाटत असतं. मात्र अनेकदा याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळतं. नवरदेव आपल्या वेगळ्या अंदाजाने नवरीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या नवरदेवाने आपल्यासाठी काहीतरी खास करावं, अशी नवरीचीही इच्छा असते. सध्या एका नवरदेव नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही थोड्या वेळासाठी कल्पना करा की, ऐन लग्न मांडवात जर नवरीनेच लग्नासाठी माघार घेतली तर ? तर त्या नवरदेवाची काय अवस्था होईल, याचा विचार मनात येतो. मग याची मस्करी जरी असली तरी काही मिनीटांसाठी मनात भीतीच येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या लग्नाच्या व्हिडीओमध्ये नवरदेव जयमालाच्या विधीसाठी तयार होतो आणि आपल्या नातेवाईकांसह स्टेजवर येतो. नवरदेव आधीच स्टेजवर उपस्थित असतो. मोठ्या आतुरतेने तो नवरीची वाट पाहत असतो.

आणखी वाचा : रातोरात स्टार झाला हा बदाम विकणारा व्यक्ती, VIRAL VIDEO मध्ये असं काय आहे ज्याने साऱ्यांनाच वेड लावलंय

ज्यावेळी नवरी नववधूच्या वेशभूषेत अगदी साज श्रृंगार करून एंट्री करते, त्यावेळी नवरदेव खूश होतो. आपल्या होणाऱ्या बायकोचं हटके स्वागत करण्यासाठी हा नवरदेव नवरीला घेण्यासाठी स्टेजखाली उतरतो. स्टेजखाली आल्यानंतर नवरदेव आपला हात पुढे करतो , त्यानंतर जे दृश्य दिसतं ते पाहून तुम्ही आनंदी व्हाल. ज्यावेळी नवरदेव नवरीसाठी त्याचा हात पुढे करतो त्याचवेळी नवरीच्या कुटुंबीयांनी नवरीचा हात मागे खेचलेा. पुन्हा नवरदेवाने त्याचा हात पुढे केला की नवरी पुन्हा पुन्हा तिचा हात मागे करते. शेवटी, नवरदेवाने नवरीला पकडलं आणि तिला स्टेजवर आणलं. यावेळी नवरी नवरदेव खूप आनंदी दिसत होते.

आणखी वाचा : OMG! भल्यामोठ्या भिंतीवर सरसर चढला अजगर! VIRAL VIDEO पाहून घरचेच काय तुम्हीही हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा सिंहाचा छावा मांजरीच्या आवाजात गर्जना काढू लागतो…,पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘वेडिंगजवर्ल्ड’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच त्यात अनेक हॅशटॅगही जोडले गेले आहेत. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत. या व्हिडीओवर लोकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘ये हुई ना बात भैया ले जाओ अपने दुल्हन को.’ दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘हे खूप क्यूट आहे.’ अनेक लोक व्हिडीओवर नवरा नवरीला आशीर्वादही देत ​​आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bride groom dulha dulhan jaimala ka video shadi google trends having fun before marriage this wedding day prp

ताज्या बातम्या