scorecardresearch

VIRAL VIDEO : लग्न न करताच पळून गेला नवरदेव, नवरीनं त्याचा पाठलाग करत गाठलं, पण….

लग्नासाठी सजून धजून बसलेली नवरीबाई या नवरदेवाचा पाठलाग करताना दिसून आली. भररस्त्यात सुरू असलेला ड्रामा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

VIRAL VIDEO : लग्न न करताच पळून गेला नवरदेव, नवरीनं त्याचा पाठलाग करत गाठलं, पण….
(Photo : Twitter/ Anand_Journ)

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास दिवस असतो. लोक यासाठी खूप आधीपासून तयारी करतात. नवरा-नवरी पुढील सात जन्मांची साथ देण्याचे वचन देत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करतात. पण एका लग्नात विचित्र घटना घडलीय. एक लग्नात नवरदेव लग्न करताच पळून गेला. याहूनही धक्कादायक म्हणजे लग्नासाठी सजून धजून बसलेली नवरीबाई या नवरदेवाचा पाठलाग करताना दिसून आली. भररस्त्यात सुरू असलेला ड्रामा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नासाठी तयारी करून बसलेला नवरदेव रस्त्यावरून पळून जाताना दिसतोय. त्याच्यामागे नवरीच्या वेशभूषेत सजलेली नवरी धावत असून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतेय. त्याच्या अडवून आपल्याशी लग्न करण्यासाठी विनवण्या करते. पण नवरदेव काही ऐकायला तयार नसतो आणि तिथून कसं पळता येईल याच्या धडपडीत असतो. शेवटी हा नवरदेव तिथून पळून जाण्यात यशस्वी होतोच.

आणखी वाचा : साखरझोपेत हसणाऱ्या बाळाचा गोंडस VIDEO VIRAL, पाहून तुमच्या चेहऱ्यावरही स्माईल येईल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिहारमधला असल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारच्या नवादा जिल्ह्यातल्या महुली गावात एक लग्न पार पडणार होतं. या गावात राहणारे राम अवतार चौहानी यांची कन्या गुड्डी कुमारी हिचं लग्न महकार नावाच्या गावातील संदीप कुमार या तरुणाशी होणार होतं. दोघंही एकमेकांशी फोनवरून गप्पा मारत असत आणि एकमेकांशी लग्न करण्याचा विचार त्यांनी पक्का केला होता. एक दिवस संदीप कुमार हा गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला. त्यावेळी गावातील सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी दोघांचं लग्न लावून द्यायचं पक्कं केलं. संदीप कुमार असं अचानक लग्न करायला तयार नव्हता. मात्र गावकऱ्यांचा एकंदरित नूर आणि आक्रमकपणा पाहून त्याने लग्न करायला होकार दिला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : एका व्यक्तीने असा नागिन डान्स केला की नाग बनून दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडीच घेतली…

दोघांचं कोर्ट मॅरेज करून तिथेच एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून दोघांचं लग्न लावून देण्याची योजना गावकऱ्यांनी आखली होती. सर्व गावकऱ्यांनी दोघांना कोर्टात आणलं. कोर्टाच्या परिसरात गाड्या थांबल्या आणि सगळे पायऱ्या चढून वर जाऊ लागले. सगळे गावकरी एकत्र जमले असल्याने त्याला तिथून पळता येत नव्हते. जर तिथून पळून गेलो नाही तर विनाकारण लग्नाच्या कचाट्यात आपण सापडू हा विचार त्याच्या डोक्यात सारखा घोंगावत होता. अखेर त्याने संधी साधली आणि तिथून तो पळून गेला. आजूबाजूला जास्त लोक लोक नसल्याने त्याला तिथून पळ काढणं जमलं.

आणखी वाचा : Naag Naagin Romance: नदीकिनारी नाग-नागिणीचा रोमान्स, VIRAL VIDEO मध्ये पुढे जे दिसतं ते पाहून थक्क व्हाल!

मात्र त्याच्या होणाऱ्या नवरीने त्याचा पाठलाग केला. भररस्त्यात त्याच्या मागे धावत आपल्याशी लग्न न करता पळून नको जाऊ, अशी विनंती केली. तिच्यासोबत असणाऱ्या आणखी एका व्यक्तीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अशी संधी दवडून तिथंच थांबला, तर जबरदस्तीने लग्न करावं लागेल…म्हणून नवरीचंही ऐकूनही न घेता तिथून जिवाच्या आकांताने त्याने धूम ठोकली. सर्व शक्ती पणाला लावून तो धावत सुटला आणि रस्त्यावरचा डिव्हायडर ओलांडून गर्दीत गायब झाला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : महिला आंघोळीसाठी जात होती अन् १२ फूट लांबीचा अजगर दिसला; पुढे जे घडले ते पाहून हादरून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : हॅलो मुख्यमंत्री साहेब! दुकानदार मला समोसाबरोबर डिश आणि चमचा देत नाही, कृपया मदत करा…

हा व्हिडीओ फारच मजेदार आहे. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरून हसू लागले आहेत. हा व्हिडीओ Anand_Journ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या