Viral video: लग्नात नवरी आणि नवरदेवाकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यांना पाहण्याची उत्सुकता पाहुण्यांना असते. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्सुकता खरंतर नवरा-नवरीला एकमेकांना पाहण्याची असते. दोघंही एकमेकांसमोर येतातच हृदयाची धडधड वाढते, पोटात गोळा येतो. काही जण तर थरथर कापू लागतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी या मंचावर एखादा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मणीय क्षण असतो. परंतु हाच क्षण एका तरुणासाठी खुपच अपमानास्पद ठरला. भर लग्नात सर्व पाहुण्यांसमोर नवरीने नवरदेवाला अक्षरश: ढकलून दिले. या व्हिडीओमध्ये भर मंडपात नवरदेवाचा नवरीने अपमान केलाय. भर मांडवात नवरीने थेट नवरदेवा धक्का देत तोंडावर पाडलं आहे. तिचा अवतार पाहून सर्वच अवाक् झाले. पण नक्की काय झालं? कसं झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तुम्हीही पाहा हा व्हिडीओ.
खरंतर वरमालासाठी नववधू लाल जोड्यात स्टेजवर येत असते. हे लग्न उत्तर भारतातील असल्याचं दिसत आहे. जिथे नववधूसाठी लाल रंगाची साडी किंवा घागरा महत्वाचा मानला जातो. नवरी जेव्हा स्टेजवर एन्ट्री करत असते, तेव्हा नवरदेव तिला मदत करण्यासाठी पुढे जातो. तो नवरीला वर चढण्यासाठी आपला हात देतो. नववधू आधी तो हात पकडते मग रागाने नवरदेवाला स्टेजच्या खाली पाडते. सुरुवातील नवरदेवाचा तोल जातो. तो बँलेंस करण्याचा आणि न पडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण त्याचा काही फायदा होत नाही आणि तो खाली पडतो.नवरदेवाला नववधूने अशापद्धतीने खाली पडलं की जणू काही तिने नवरदेवाला त्याची खरी जागा दाखवून दिली असावी. कदाचित नववधूला तिचा नवरदेव आवडलेला नसावा ज्यामुळे ती त्याच्याशी असं वागली असावी. असा प्रकारचे तर्क वितर्क नेटकरी लावत आहेत.नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! खेळताना कढईत अडकला पाय; चिमुकली कळवत राहिली अन् शेवटी काय झालं पाहा VIDEO
हा व्हिडीओ @flywiser1 या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला लोकांनी मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय बापरे “लग्नामध्ये नवरीचं खरं रुप समोर आलं,” तर आणखी एकानं म्हंटलंय की, ”अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे”